नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लाच घेणारा भ्रष्ट ग्रामसेवक 50,000/- रुपये घेतांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

लाच घेणारा भ्रष्ट ग्रामसेवक 50,000/- रुपये घेतांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ उर्फ आर के मामा :- म्हसदी येथील भ्रष्ट लोकसेवक ग्रामसेवक श्री.मेघशाम रोहिदास बोर से, वय – 45 वर्ष ( वर्ग 3), रा. प्लॉट नं. 21, प्लॉट न 21/अ, श्रीगुरु कॉलनी, गोंदूर रोड, एस आर पाटील शाळेच्या मागे, वलवाडी, देवपूर धुळे यांनी दिनांक 07.03.2024 रोजी 2,00,000/- रुपये लाचेची मागणी केली होती.
  • पैकी दिनांक 25.04.2024 रोजी पहिला हप्ता  50,000 /- रुपये लाच स्वीकारताना पकडले. सविस्तर वृत्त – तक्रार दार यांची पत्नी ग्रामपंचायत च्या सदस्य आहेत.
  • तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी आलोसे यांची भेट घेऊन त्यां ची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील विकास कामांना मंजुरी मिळणे करिता अर्ज देऊन त्यांना विनंती केली.
  • भ्रष्ट लोकसेवक ग्रामसेवक श्री.मेघशाम रोहिदास बोरसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रकेत 12,00,000/- रुपये किमती च्या 20 टक्क्याप्रमाणे 2,40,000/- रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि 04.03.2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती.
  • सदर तक्रारीची दि. 07.03.2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान भ्रष्ट लोकसेवक ग्रामसेवक श्री.मे घशाम रोहिदास बोरसे यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अं ती 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कमे पैकी 50,000/- रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले.
  • त्यानुसार सदर दि.25.04.2024 रोजी सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे 2,00,0 00/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50,000/- रुपये मजदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः पंचां समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
  • असुन त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • लाचेचा यशस्वी सापळा कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिका री मा.श्री.अभिषेक पाटील, सापळा व तपासी अधिकारी रूपा ली खांडवी, सापळा पथक पो. हवा. राजन कदम, पो.शि.राम दास बरेला, पो. शि. प्रशांत बागुल, चा. पो. शि. बडगुज यांनी मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला. प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण केली.
  • तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ मो.नं. 8888881449, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रति बंधक विभाग धुळे मोबाईल नं. 8379961020 दुरध्वनी क्रं.0253-2578230 , टोल फ्रि क्रं. 1064 या नंबरला संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा