नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , धाराशिवमध्ये मनसेचे  इंजिन चालणार का..? राज ठाकरेंच्या दौऱ्याचे नियोजन सुरू. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

धाराशिवमध्ये मनसेचे  इंजिन चालणार का..? राज ठाकरेंच्या दौऱ्याचे नियोजन सुरू.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- आगामी विधानसभा निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर जिल्हानिहाय दौऱ्याला सुरुवात केली आहे.
  • मतदारसंघ निहाय आपल्या ताकदीचा अंदाज ठाकरे घेत आहेत. पक्षाने दिलेल्या निरोपानुसार धाराशिव येथे पदाधिका ऱ्यांची शुक्रवारी नियोजन बैठक पार पडली.
  • पुढील चार दिवसांत हा दौरा होणार असल्याचे समजते. धारा शिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. मनसेकडे पुरेसे बळ नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने बळ वाढ विण्याची संधी आहे.
  • ऐनवेळी काही ताकदीवर इच्छुक पक्षाला काही मतदारसंघात मिळू शकतात. त्याचा फायदा पक्षवाढीला होऊ शकतो.
  • या अनुषंगाने आगामी चार दिवसांत पक्षप्रमुख राज ठाकरे धा राशिवच्या मुक्कामी दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मुक्का म केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पदाधिकाऱ्यां कडून उस्मानाबा द, जिल्हा चा आडावा घेण्यात येईल.
  • मनसेच्या मुंबई पक्ष कार्यालयातून स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या सूचनेनुसार पक्षप्रमुख राज ठाकरे हे दि. ५ व ६ ऑगस्ट रोजी धाराशिवच्या दौऱ्यावर असतील.
  • दि. ५ रोजी सायंकाळी सोलापूरहून धाराशिवात दाखल होऊ न हॉटेलवर मुक्काम करतील.
  • दि. ६ रोजी सकाळपासून आढावा घेतील व त्यानंतर माध्य मांशी संवाद साधून ते पुढे लातूरच्या दौऱ्यावर जातील. मात्र, हा दौरा अधिकृत कार्यक्रम आल्यानंतरच सांगता येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
  • विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यात मतदारसंघातील पक्षाचे प्लस व मायनस पॉईंट, ओळखून कोणत्या मतदारसंघात किती ताकद लावायची, इतर पक्षांतील कोणी नेता गळाला लागू शकतो का, यावरही मंथन होणार असल्याचे कळते.
  • या दौऱ्यानिमित्त शुक्रवारी धाराशिव येथे पदाधिकाऱ्यांची नि योजन बैठक पार पडल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, माजी जिल्हाध्यक्ष दादा कांबळे म्हणाले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा