नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अंबरनाथमध्ये थरारक हिट अँड रनची घटना; दोन कुटुंबातील वाद, कार चालकाने गाडीला ठोकले, अनेकांना चिरडले, महिला, लहान मुलाचा समावेश.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

अंबरनाथमध्ये थरारक हिट अँड रनची घटना; दोन कुटुंबातील वाद, कार चालकाने गाडीला ठोकले, अनेकांना चिरडले, महिला, लहान मुलाचा समावेश. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : रियाज अतीक :- कल्याण-बदलापूर रस्त्यावरी ल अंबरनाथमध्ये हिट अँड रनची एक थरारक घटना समोर आली आहे. ज्यात एका कार चालकाने अनेकांना उडवले.
  • या घटनेबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार दोन कुटुंबातील वादात हा प्रकार घडल्याचे समजते.
  • या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ज्यात दोन गाड्या दिसत आहेत आणि आजूबाजूला काही लोकांची तसेच इतर गाड्यांची गर्दी आहे.
  • दोन चार चाकी गाड्या आहेत ज्यामध्ये एक गाडी काळ्या रं गाची तर दुसरी पांढऱ्या रंगाची आहे. यातील काळ्या रंगाच्या गाडीचा चालक वेगाने येऊन पांढऱ्या रंगाच्या गाडीला घासून पुढे जातो.
  • हा प्रकार अशा वेळी घडतो जेव्हा पांढऱ्या रंगाच्या गाडीतील चालक गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता.
  • त्या ठिकाणी तिघे उभे होते, त्यांना उडवून चालक वेगाने गा डी मीटर पुढे घेऊन जातो. यूटर्न घेऊन तो पुन्हा माघारी येत असताना तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला चालकाने उडवले.
  • यूटर्न घेऊन कार चालक पुन्हा वेगाने येत पांढऱ्या रंगाच्या गाडीला समोरून वेगाने धडक देतो. यात पांढऱ्या रंगाची गाडी काही अंतर मागे जाते.
  • पांढऱ्या गाडीच्या मागे दुचाकीवर उभे असलेले दोघे जण गाडीच्या चाकाखाली येतात. ते दोघेही फरफटत जातात.
  • या दुचाकीच्या मागे काही अंतरावर उभे असलेल्या अन्य एका दुचाकीवर एक पुरुष आणि महिला होती त्यांना देखील धडक बसते आणि ते दोघेही खाली पडतात.
  • दरम्यान काळ्या रंगाच्या गाडीच्या चालकाने जेव्हा दुसऱ्यांदा धडक दिली तेव्हा गाडीच्या खाली एक लहान मुलगा आला. त्याला नंतर एका व्यक्ती उचलून घेऊन जाताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
  • आधी कारला धडक नंतर यूटर्न घेऊन पुन्हा येऊन धडक, अने क जण जखमी हा सर्व प्रकार झाल्यावर एक व्यक्ती काळ्या रंगाच्या गाडीच्या पुढच्या चाकावर दगड टाकताना दिसत आहे.
  • या सर्व घटनेत काही महिला देखील दिसत आहेत. पांढऱ्या रंगाच्या गाडीत काही महिला आणि लहान मुले असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.
  • प्राथमिक माहितीनुसार हे दोन्ही कुटुंबीय मुंबईचे असल्याचे कळते. या दोन कुटुंबातील वादामुळे हा प्रकार घडल्याचे कळते.
  • दरम्यान यात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारा साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळाली नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा