नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाचल गावात दारु दुकानाला परवानगी न देण्याचा ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पाचल गावात दारु दुकानाला परवानगी न देण्याचा ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यात विस्ताराने व लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या पाचल ग्रामपंचायती ने गावात दारु दुकानाला परवानगी न देण्याचा एकमुखी ठरा व ग्रामसभेत संमत केला याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेत चर्चे ला ठेवण्यात आला होता.
  • सरपंच बाबालाल फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रा मसभेत हा विरोधाचा ठराव संमत करण्यात आला.
  • या ठरावानंतर ग्रामस्थ व महिलांनी या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले पाचल गावातील एका व्यक्तीने गावात देशी दारूचे दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.
  • या अर्जावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली या चर्चे दरम्यान एका ग्रामस्थांने या ठरावाला समर्थन देण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्व ग्रामस्थ व महिलांनी कडाडून विरोध केला.
  • त्यानंतर सरपंच फरास यांनी याला ज्याचे समर्थन असेल त्यां नी हात वर करावे अशी सूचना केली त्यानंतर सभागृहातील एकानेही हात वर केला नाही.
  • त्यानंतर देशी दारूचे दुकान सुरु‌ करण्यासाठी आलेला अर्ज एक मुखाने फेटाळण्यात आला यापुढे गावात देशी दारू दुका नाला परवानगी न देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
  • ग्रामसभेत बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलीवरील अत्या चाराचा जाहीर निषेध करण्यात आला अशा प्रकारच्या घटना आपल्या गावात घडू नयेत म्हणून सतर्क राहण्याचे आवाहन माजी सरपंच अशोक सक्रे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा