शिवडी येथील किर्ती रात्र विद्यालयात ‘तिमिरातुनी तेजाकडे’ यांच्या वतीने २९६ वे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- किर्ती रात्र विद्यालय शिव डी प्रशालेत तिमिरातुनी तेजाकडे यांच्या वतीने बुधवार दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्यकाळी ७.०० वाजता स्पर्धा परीक्षां चे मार्गदर्शन करण्यात आले.
- शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर गरीब विद्यार्थी मागे पडतात याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव.
- सदर बाबीचा विचार करुन सन्मा श्री चंद्रकांतराव शिंदे अध्य क्ष प्रगती मंडळ मुंबई यांनी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
- प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर सर (बीकॉम, एमकॉम, एमए(हिंदी), एमए (पब्लिक ऍडमिन), एलएलबी, पीजीडीएचआरएम, पीजीडीएलएल & आयएल, पीजीडीटी) कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क विभाग मुंबई, भारत सरकार ह्यांचे हे २९६ वे निःशुल्क मार्गदर्शन शिबिर होते.
- विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा क रावा,स्पर्धा परीक्षांमध्ये यूपीएससी अंतर्गत कोणत्या शासकी य विभागात नोकरी मिळवता येते, केंद्र व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या सेवा, सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
- आजची वास्तविक शिक्षण पद्धती शिकता शिकता स्पर्धा परी क्षा व आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे. एम.पी.एस.सी अंतर्गत कोणत्या शासकीय नोकऱ्या उपलब्ध असतात, याविषयीही मार्गदर्शन केले.
- त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सरळ सेवा भरती को णत्या पदासाठी असते, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या भर ती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय असते या बाबत ही माहिती दिली.
- सदर मार्गदर्शन शिबिरास प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत राव शिंदे, विश्वस्त, मुख्याध्यापक श्री. शिवाजी आव्हाड, शिक्ष क व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
- सूत्रसंचालन श्री गोरख इंगोले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.सत्यविजय डांबरे सर यांनी केले.
- किर्ती रात्र विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना बहुमूल्य निःशुल्क मार्गदर्शन केल्या बद्दल प्रगती मंडळ मुंबई यांनी श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांचे आभार व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space