मॉडर्न हायस्कुलच्या जेष्ठ शिक्षिका अनुराधा अंबेकर सेवानिवृत्त.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथील मॉ डर्न हायस्कुल येथील जेष्ठ शिक्षिका आपल्या २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवा निवृत्त झाल्या.
- विज्ञान विषयाचे परिणामकारक अध्यापन करण्यात त्यांचा हातखंडा होता. अध्यापनाबरोबर गायन,चित्रकला, संगीत अ शा विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्याचे प्राचार्या शारदा साबळे यांनी सांगितले.
- यावेळी शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ देऊ न त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथम मुख्याध्यापिका शार दा साबळे यांनी प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
- गंगाधर वाघमारे यांनी अनुराधा अंबेकर यांच्या शैक्षणिक का र्याचा परिचय करून दिला.
- पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी अनुराधा अंबेकर यांना सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा देताना त्यांच्या ज्ञानदानातील योगदाना ची माहिती दिली.
- यावेळी मॉडर्न हायस्कुलचे शिक्षक दिलीप गुंड,गौरी देशपांडे, वैशाली देसले,सुमिता घुगे(पाटील),दिनेश कुलकर्णी या शि क्षकांनी अनुराधा अंबेकर यांना शुभेच्छा दिल्या.
- यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येत त्यांचे नाते वाईक,आप्तेष्ट आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीकृष्ण निकम यांनी तर आभार शिवाजी अंबिके यांनी मानले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space