
दळे परिसरातील भातशेतीवरील करपा रोगाची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतीच्या बांधावर.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील दळे परिसरात भात शेतीवर करपा रोग पडल्याने तसेच जास्ती च्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हत बल झाला आहे शासनाकडून पंचनामे होऊन शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळावी.

- याबाबत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी श्री.स्वप्निल सोगम यांनी मा.आमदार सामंत यांना श्री.गिरी षजी करगुटकर यांचे हस्ते निवेदन सादर केले होते.
- सदर निवेदनाची तातडीने दखल घेत आमदार महोदयांनी मा.तहसिलदार राजापूर यांना पाहणी संदर्भात सुचना दिल्या त्यानुसार
- कृषी सेवक श्री.शिंदे, तलाठी श्री.नाडे, सरपंच श्री.महेश करगुटकर यांनी नुकसानीची पाहणी केली श्री स्वप्निल सोगम यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आमदार महोदय, कृषी अधिकारी, तलाठी यांनी पाहणी दौरा केल्याबद्दल शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









