
भाजपा दिव्यांग आघाडी “तालुकाध्यक्षपदी” तानाजी घोडके यांची निवड.
- प्रतिनिधी : परडां : फारूक शेख :-दि.१५ तालुक्यातील देऊळगाव येथील दिव्यांग तानाजी घोडके यांनी २०१३ मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून दिव्यांगत्वावर मात करत परंडा शहरात छोटासा संगणक व्यवसाय चालू केला.
- अनेक युवकांना संगणकाचे प्रशिक्षण देत असताना त्यांनी ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगाव या संस्थेची नोंदणी केली व या अंतर्गत दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या दिव्यांग संघटनेची स्थापना केली.

- तालुक्यातील दिव्यांगाना सेवा देण्यासाठी कार्यरत राहिले. त्यांनी कोरोना कालावधीमध्ये उद्योजक रामभाऊ पवार यांच्यासोबत काम केले.
- दिव्यांगाना अन्नधान्य वाटप , प्रशासनासोबत पत्र व्यवहार करून प्रशासनाकडून मदत मिळवून देणे, सन २०१५ पा सून त्यांनी दिव्यांग सेवेला वाहून घेतले.
- परंडा तालुक्यात अनेक दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून दि ले,संजय गांधी निराधार योजना पगारी चालू करून दिल्या , दिव्यांग व्यक्तींना विविध उपकरणे हात बसवणे, पाय ब सवणे, मोर्चा आंदोलने, सवांद, सभा तसेच प्रत्येक महिन्या ला दिव्यांग तपासणी शिबिर परंडा, तसेच धाराशिव मधी ल सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात आले.
- दिव्यांगना विविध प्रशिक्षणे दिली, जिल्हा परिषद सेस खा ते या अंतर्गत अनेकांना आर्थिक मदत मिळवून देण्यात आले.पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
- अशा विविध कामाच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळ वून देण्याचे काम तानाजी घोडके यांनी केले.
- त्यांच्या या कामाची दखल घेऊन आमदार राणा जगजीत सिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे भाजप नेते माजी आ मदार सुजितसिंह ठाकूर साहेब जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कु लकर्णी दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष समाधान मते यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी घोडके यांची भाजपा दिव्यांग आघाडी परंडा तालुका अध्यक्षपदी निवड केली, ठाकूर यां च्या सत्कार करण्यात आला.
- यावेळी तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे , जिल्हा सरचिट णीस गणेश खरसडे माजी सरचिटणीस विकास कुलकर्णी युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते युवा नेते समरजी तसिंह ठाकुर, निशिकांत क्षिरसागर, श्रीमंत शेळके रामदा स गुडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या नि वडीबद्दल सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











