खुशखबर…! प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी ; नालासोपारा–बोरीवली–सायन–मंडणगड–विरसई मार्गे डौली ‘रातराणी’ एसटी सेवा सुरू.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- दापोली व मंडणगड तालुक्या तील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.
  • मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभाग (मंडणगड आगार) व विरसई जनसेवा मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून नालासोपारा–बोरीवली–सायन–मंडण गड–विरसई मार्गे डौली ही नवीन ‘रातराणी’ एसटी गाडी सुरू करण्यात आली आहे.
  • ही सेवा दि. २१ डिसेंबर २०२५ पासून नियमितपणे सुरू होत असून, गावावरून थेट मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसा ठी ही सेवा अत्यंत सोयीची व आरामदायक ठरणार आहे.
  • गाडीचा तपशील
  • गाडीचे नाव : नालासोपारा–बोरीवली–मंडणगड–विरसई मार्गे डौली. सेवा प्रारंभ : २१ डिसेंबर २०२५ गाडी सुटण्याची वेळ.
  • नालासोपारा येथून : रात्री ८.२० वाजता.
  • डौली येथून : रात्री ८.३० वाजता
  • विरसई जनसेवा मंडळाचे सचिव श्री.सुरेश बेटकर, उपास चिव श्री.संदीप राणे व अध्यक्ष श्री नंदकुमार धोत्रे यांनी प्र वाशांना आवाहन केले आहे की, या नवीन एसटी सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व गाडी कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाला सहकार्य क रावे. गाडी नेहमीच ‘हाऊसफुल’ ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
  • मुंबई–कोकण दरम्यान रात्रीच्या सुरक्षित, सुखकर व थेट प्रवासासाठी ही ‘रातराणी’ एसटी सेवा प्रवाशांसाठी निश्चि तच वरदान ठरणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles