परप्रांतीय फेरीवाल्यांना गावात प्रवेश बंदी, तळवडे ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण ठराव.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- परप्रांतीय फेरीवा ल्यांना प्रवेश बंदी करण्याचा त्याचबरोबर मोकाट जनावरे सोडणा-या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा महत पूर्ण ठराव तळवडे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.
  • सरपंच सौ.गायत्री साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाले ल्या सभेत हा ठराव करण्यात आला. राजापूर पुर्व भागात असा महत्त्वपूर्ण ठराव करणारी तळवडे ही एकमेव ग्रामपं चायत असल्याने सर्वच स्तरातून या ग्रामपंचायतीचे अभि नंदन करण्यात येत आहे.
  • प्रारंभी ग्रामविकास अधिकारी मंगेश जाधव यांनी उपस्थि तांचे स्वागत करुन इतिवृत्त वाचन केले सदरचे इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
  • यानंतर विकास कामावर चर्चा होऊन कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील तळवडे हे मधाचे गाव म्हणून जाहीर झाले असून याबाबत सरपंच सौ.गायत्री साळवी यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.
  • जल जीवन योजनेतंर्गत कामाचा आढावा घेण्यात आला व ही कामे अधिक जलदगतीने करण्याचे ठरले. सध्या प रिसरात तसेच तालुक्यात चो-या दरोडे, खून अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
  • त्यामुळे गावात येणारे परप्रांतीय फरीवाले यांना गावात येण्याची प्रवेश बंदी करण्याचा ठराव तसेच मोकाट जना वरे सोडणा-या मालकांवर दंडात्मक करण्याचा ठराव ग्राम स्थांनी मांडला.
  • हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावात विविध विकास कामं सुरू असलेल्या बदल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
  • यावेळी माजी सरपंच आत्माराम चव्हाण, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, संदीप बारसकर, सुनील गुरव,अ मित चिले, राजन गुरव, भगवान कोकरे, पत्रकार सुरेश गुडे‌ कर या सर्वांनी विकासात्मक कामाची चर्चा करून आपले विचार मांडले.
  • एकंदरीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही सभा पार पडली. सभेला महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles