
नगराध्यक्षपदी झाकीर सौदागर हे १८९ मताने विजयी; परंडा नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकिवला : झाकीर सौदागर
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-धाराशिव जिल्ह्याती ल परंडा नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लड ती मध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे.
- शिवसेनेचे उमेदवार झाकीर इस्माईल सौदागर हे 189 म तदानाने विजयी झाले असून त्यांनी जनशक्ती नगर विका स आघाडीच्या उमेदवाराचा विश्वजित पाठी यांचा पराभव केला आहे.

- परंडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.
- विजयी उमेदवारः परंडा नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे उमे दवार एम.झाकीर, एम.इस्माईल सौदागर यांना एकूण ६,७९५ मते मिळाली.
- पराभूत उमेदवारः त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी आणि जनश क्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांना ६,६०६ मते मिळाली.
- पक्षनिहाय जिंकलेल्या जागांचा तपशील खालीलप्रमाणेः
- जनशक्ती नगर विकास आघाडी (एकूण १२ जागा ):
- बन्सोडे रत्नमाला, विधाते श्रीकृष्ण, पठाण रुक्सानाबेगम, परवीन मन्नान बाशा, मदनसिंह सद्दीवाल, पठाण मदिना बी, ठाकूर समरजितसिंह, शिंदे अनिल, वैशाली सोमनाथ आल्बट्टे, अब्बास मुजावर, रुखियाबी डहेलूस आणि परदे शी रमेशसिंह.
- शिवसेना शिंदे गटाचे (एकूण ८ जागा):
- सरफराज कुरेशी, शमीम रशीद तांबोळी, सत्तार गुलाबखा पठाण, सौदागर एम. साबेर, मुजावर अमिनाबी, मन्नाबी मतीन जीनेरी, चंद्रकांत नाना गायकवाड आणि शिंदे वन माला.
- या निकालामुळे परंडा शहरात शिंदे गटाचे जाकीर सौदाग र यांच्या कार्यकर्त्यांनी चौकात गूलाल उधळून फटाके फो डून पेडे वाटून जल्लोष केला आहे.
- (विश्वजीत पाटील यांनी ऑब्जेक्शन घेतले होते निवडणूक अधिकारी यांनी विश्वजीत पाटील यांचे ऑब्जेक्शन फेटा ळून लावले. )
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











