साक्री तालुक्यातील म्हसदी गावचे ग्रामपुरोहित महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने सन्मानित.

  • प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालु क्यातील म्हसदी गावचे ग्रामपुरोहित आचार्य दीपक रत्ना कर दीक्षित (गणू महाराज) यांनी समाजसेवा,अध्यात्म आ णि संस्कार यांच्या त्रिसूत्रीने उभा केलेला कार्यप्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
  • त्यांच्या अथक लोकसेवेची दखल घेत दिनांक 21/12/ 2025 रोजी Agrocare Group of Companies तर्फे आयोजित ‘गौरव महाराष्ट्राचा’ या भव्य कार्यक्रमात त्यांना ‘महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • हा सन्मान Mrs Global United Elite – लाइफटाइम क्वीन (U.S.A.) यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
  • यावेळी डॉ.कैलास मोते(आत्माचे माजी प्रकल्प संचालक) , भूषण निकम (संचालक, अग्रोकेअर ग्रुप), रोहिणी पाटी ल यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती.
  • समाजहिताचे बीज ते समाजाचा आधार
  • म्हसदी ग्रामभूमीत जन्मलेले गणू महाराज बालपणापासू नच अन्याय, अंधश्रद्धा व सामाजिक दु:खांविरुद्ध उभे राहिले.
  • १२ वीपर्यंत औपचारिक शिक्षण असले तरी “मानवसेवा हाच खरा धर्म” हा विचार त्यांनी जीवनध्येय मानला.
  • गेल्या १३ वर्षांपासून त्यांनी अन्नदान, रक्तदान, वस्त्रदान, जनजागृती मोहिमा, तसेच कोरोना काळात शेकडो कुटुंबां ना जीवनावश्यक मदत देत मानवतेचा दीप उजळवला.
  • अध्यात्मिक नेतृत्व आणि सामाजिक भान
  • ग्रामपुरोहित म्हणून पूजा, पारायण, हरिनाम सप्ताह यांचे आयोजन करतानाच सियाराम कुंड, हनुमान जन्मभूमी आदी ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवून त्यांनी श्रद्धा आ णि सेवा यांचा समतोल साधला.
  • त्यांच्या प्रवचनांतून संयम, सत्यनिष्ठा आणि समाजहिता चा संदेश ठळकपणे उमटतो.
  • लोकहितासाठी ठाम भूमिका
  • पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व रस्ते अशा मूलभूत प्रश्नां वर त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
  • युवकांना समाजकार्याकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन शिबि रे, एकात्मतेचे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी गावागा वांत  सकारात्मक ऊर्जा पसरवली.
  • पुरस्कारांची पंक्ती
  • गणू महाराज यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही
  • सामाजिक प्रबोधन पुरस्कार
  • आदर्श युवक पुरस्कार
  • राष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार
  • सुवर्ण पदक मानचिन्ह पुरस्कार
  • लोकसेवा गौरव सन्मानपत्र (2021) असे अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यात आता ‘महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार’ ची भर पडली आहे.
  • प्रेरणास्थान ठरलेले व्यक्तिमत्त्व
  • आज गणू महाराज केवळ साक्री तालुक्याचे नव्हे, तर उत्तर महाराष्ट्राचे प्रेरणास्थान झाले आहेत. “ज्याच्या मना त सेवा आहे, त्याच्या जीवनातच देव वसतो” ही त्यांची उक्ती त्यांच्या कार्यातून साकार होते.
  • सेवा, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम साधणारे हे व्यक्तिमत्त्व समाजाला दिशा देत राहो—हीच सर्वांची सदिच्छा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles