नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बाजारात LIC चा शेअर पुन्हा धडाम….! – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

बाजारात LIC चा शेअर पुन्हा धडाम….!

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर : नितीन राने :- आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअर्समध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा शेअर त्याच्या IPO किमतीच्या सुमारे ५०% खाली घसरला आहे. बाजारात शेअरच्या घसरणीत गुंतवणूकदार मात्र धास्तावले आहेत.
  • LIC Share Target Price
  • हायलाइट्स:
  • अदानी-हिंडेनबर्ग विवादात LIC च्या शेअर्सचं नुकसान सहन करावं लागत आहे
  • एलआयसीचा शेअर सर्वकालीन नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे
  • बाजारात शेअरच्या घसरणीत गुंतवणूकदार मात्र धास्तावले आहेत.
  • अदानी ग्रुप आणि हिंडेनबर्ग यांच्या प्रकरणात पुन्हा एकदा एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरणीची नोंद करण्यात आली आहे.
  • अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणात अडकलेल्या एलआयसीच्या शेअर्समध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विक्रीचा दबाव दिसत आहे.
  • दरम्यान, एलआयसीचा शेअर त्याच्या IPO किमतीच्या बँडपेक्षा ५०% खाली घसरला आहे. देशातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा एलआयसीचे शेअर्स मंगळवारच्या बाजार सत्राच्या सुरुवातीला आपल्या सर्वकालीन नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचले आहेत.
  • आजच्या बाजार सत्रात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या समभागांनी (एलआयसी शेअर) आज NSE वर ६००.४० रुपयांचा नवा नीचांक गाठला.
  • अशा परिस्थितीत पुन्हा एकदा एलआयसीच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मात्र अनेक ब्रोकरेजने एलआयसीवर विश्वास दाखवत शेअरची किंमत भविष्यात वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
  • चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात वार्षिक आधारावर अनेक पटींनी वाढ नोंदवण्यात अली असून त्यांचे प्रीमियमही उत्पन्न वाढले आहे.
  • चांगल्या तिमाही निकालानंतर, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एलआयसी शेअरवरील खरेदी सल्ला कायम ठेवला. ब्रोकरेजने म्हटले की कंपनीची वार्षिक प्रीमियम वाढ (एपीई) मध्यम आहे.
  • एलआयसीवर ब्रोकरेजचे मत काय?
  • एलआयसीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी एलआयसीवर खरेदी करण्याचा सल्ला देत प्रति शेअर किंमत ८३० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
  • यापूर्वी १० फेब्रुवारी २०२३ रोजी शेअरची किंमत ६२० रुपये प्रति शेअरवर बंद झाली होती. अशाप्रकारे, सध्याच्या किंमतीपासून ब्रोकरेजने स्टॉकमंदाचे सुमारे ३४ टक्क्यांची मजबूत उसळीचा अंदाज वर्तवला आहे.
  • दरम्यान गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
  • लक्षणीय आहे की मागील एका महिन्यात एलआयसीशेअर्समध्ये १४.४५ टक्क्यांनी पडझड झाली असून कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसा ओतलेल्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावा लागला आहे.
  • ५८२.३५ रुपये एलआयसीचा ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे तर ९४९ शेअरचा सर्वकालीन उचचांक आहे.
  • एलआयसीचे तिमाही निकाल
  • चालू वर्षाच्या डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत विमा कंपनीने ६,३३४.१९ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत २३४.९१ कोटी रुपये होता.
  • सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत नफा कमी असला तरी, एलआयसीला Q2 मध्ये १५,९५२.४९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. याशिवाय कंपनीच्या निव्वळ प्रीमियम उत्पन्नात १४.५% ची वाढ नोंदवली गेली, जी १.११ लाख कोटी रुपये आहे. 
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/
  • ( नोट: वर दिलेली माहिती शेअर्सच्या कामगिरीच्या आधारावर देण्यात आली आहे. शेअर बाजारात खरेदी/विक्री करताना तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमच्या अधीन आहे. )

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा