
परंडा एस.टी. आगारात सवलत कार्ड वाटपात आनंदी आनंद; एजन्सी प्रतिनिधींच्या मनमानीमुळे ज्येष्ठ नागरिक अन् महिलांचे हाल….! वाढीव दराने वसुली होत असल्याचा प्रवाशांचा आरोप; परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) आगारात सवलत कार्ड वाटप प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला असून, संबंधित एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
- एजन्सीचे प्रतिनिधी वेळेवर हजर राहत नसल्याने वयोवृ द्ध, महिला आणि दिव्यांग बांधवांना तासनतास ताटकळ त राहावे लागत आहे.
- त्यातच ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने संताप व्यक्त हो त असून, राज्याचे परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड (सवलत कार्ड) काढण्यासा ठी नागरिक मोठ्या आशेने आगारात येत आहेत.
- मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्ड वितरणासाठी नियुक्त केले ल्या खासगी एजन्सीचे प्रतिनिधी आपल्या मनमानीनुसार कामावर येतात.
- गुरुवारी सकाळी ७ वाजेपासूनच अनेक ज्येष्ठ नागरिक रां गेत उभे होते, मात्र दुपारी उशिरापर्यंत प्रतिनिधी न आल्या ने गोंधळ निर्माण झाला.
- रणरणत्या उन्हात उभे राहून अनेकांना त्रास सहन करावा लागला, तर काहींना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
- आर्थिक लुबाडणुकीचा गंभीर आरोप या प्रक्रियेत केवळ विलंबच नाही, तर आर्थिक लुबाडणूक होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
- कार्डसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे काही एजन्सी प्रतिनिधींकडून मागितले जात आहेत.
- “आम्ही हक्काच्या सवलतीसाठी आलो आहोत की लूट व्हायला?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
- काही दलाल आणि एजन्सीमधील साटेलोटे यामुळे हा प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात आहे.
- आगार व्यवस्थापकांकडे तक्रारीचा पाढा त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि ज्येष्ठ प्रवाशांनी आगार व्यवस्थापक बालाजी मुळे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
- कार्ड वाटप प्रक्रिया पारदर्शक करावी, एजन्सीला वेळेचे बंधन घालावे आणि वाढीव दर घेणाऱ्यांवर कठोर कारवा ई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- सध्या सुरू असलेल्या या ढिसाळ कारभारामुळे एस.टी. प्रशासनाच्या प्रतिमेला तडा जात आहे.
- जिल्हा प्रशासनाने आणि परिवहन विभागाने या प्रकरणा ची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तत्काळ कारवाई करा वी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






