अहोरात्र ऑन ड्युटी, सण-उत्सवातही घराची तुटी….! पोलीस दलाच्या त्यागाची जनमानसात चर्चा प्रत्येक संकटात पोलिसांचीच धाव; सुटीविना कर्तव्य बजावणाऱ्या ‘खाकी’ च्या व्यथा मांडणारी विशेष बातमी.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- घरात भांडण असो वा शेता तील बांधावरून झालेला वाद, अपघात असो वा चोरीची घटना, एखाद्याने विष प्राशन केले असो वा आत्महत्येचा प्रयत्न झाला असो; सामान्य नागरिकाच्या तोंडी सर्वात आ धी एकच शब्द येतो, तो म्हणजे “बोलवा पोलिसांना…!”.
  • समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोवी स तास तत्पर राहणारा पोलीस कर्मचारी प्रत्यक्षात मात्र स्वतःच्या कौटुंबिक सुखाला पारखा होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
  • सण-उत्सवातही बंदोबस्ताचे ‘साकडं’
    सर्वसामान्य नागरिक जेव्हा दिवाळीत फटाके फोडण्यात, होळीच्या रंगात न्हाऊन निघण्यात किंवा गावच्या जत्रेत आनंद लुटण्यात मग्न असतात, तेव्हा पोलीस मात्र रस्त्या वर उभे राहून ‘बंदोबस्त’ करत असतात.
  • शिमगा असो, यात्रा असो वा उरूस, खाकी वर्दीला सणां ची सुटी नसतेच. त्यातच निवडणुकांचे बिगुल वाजले की पोलिसांची ड्युटी आणि ताण दुपटीने वाढतो.
  • व्ही.आय.पी ड्युटीचा अतिरिक्त भार
  • केवळ गुन्हेगारी रोखणे इतकेच पोलिसांचे काम राहिलेले नाही. मंत्री, आमदार किंवा खासदार यांचा दौरा असला की, पोलिसांना आपल्या कुटुंबाचा विचार सोडून तासन तास प्रोटोकॉल आणि सुरक्षेसाठी तैनात राहावे लागते.
  • या ‘व्हीआयपी’ ड्युटीमुळे पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्या वर मोठा परिणाम होत आहे.
  • कुटुंबासाठी वेळ नाही,लग्नाकार्याला सुटी नाही “चौवीस तास ड्युटी करूनही पोलीस काम करत नाहीत,” अशी ओरड अनेकदा नागरिकांमध्ये ऐकायला मिळते.
  • मात्र, या वर्दीच्या मागे असलेल्या माणसाचा विचार कोणी करत नाही. स्वतःच्या मुलाचा वाढदिवस असो, नातेवाई काचे लग्न असो वा घरातील एखादा आजारपण, पोलिसां ना वेळेवर सुटी मिळणे दुरापास्त झाले आहे.
  • अहोरात्र कर्तव्यावर राहिल्यामुळे अनेक पोलीस कर्मचा ऱ्यांना आपल्या संसाराकडे नीट लक्ष देता येत नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे.
  • कर्तव्य आणि वास्तव
  • पोलीस नागरिकांना २४ तास सेवा देतात, गुन्हेगारांवर वच क ठेवतात आणि समाजाचे रक्षण करतात. तरीही, काही वेळा नागरिकांकडून होणारी टीका पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणारी ठरते.
  • “पोलीस काय करतात?” असा प्रश्न विचारण्यापूर्वी, ते को णत्या परिस्थितीत काम करतात, हे समजून घेण्याची गरज असल्याचे जाणकार व्यक्त करत आहेत.
  • आपल्या घरापासून दूर राहून समाजाच्या घराचे रक्षण कर णाऱ्या या ‘खाकी’तील योद्ध्यांप्रती सहानुभूती आणि आ दर ठेवणे, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles