ये नया ईंडीया है…! गुगल,यु ट्युब,स्टार बक्स पर्यंत सगळीकडे भारतीयांचा डंका
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- रिपोर्टर : नितीन राने :- भारताचा विकास ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून जगभरात फक्त आणि फक्त भारताचीच चर्चा केली जात आहे.
- भारत करत असलेल्या प्रत्येक बारीक गोष्टीकडे जगातील प्रत्येक देशाचे लक्ष असून, प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी स्वतःला सिद्ध केले आहे.
- असे एकही क्षेत्र नाही जिथे भारतीय नाही. आज आम्ही अशाच काही भारतीयांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांच्यामुळे जगभर भारताचा डंका वाजत आहे.
- जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर एका भारतीयाने अव्वल स्थान पटकावले आहे.
- भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे पुढील सीईओ असणार आहेत. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती दिली आहे.
- यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओदेखील भारतीय असून, अल्फाबेटचे नेतृत्व सध्या सुंदर पिचाई यांच्याकडे आहे.
- Google देखील या कंपनीचा एक भाग आहे. या अर्थाने बघितले गेल्यास गुगलचे सीईओदेखील सुंदर पिचाईच आहेत.
- सुंदर पिचाई यांना 2015 मध्ये गुगलचे सीईओ बनवण्यात आले होते. त्यानंतर ते 2019 मध्ये अल्फाबेटचे सीईओ बनले.
- सत्या नाडेला हे जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत.
- याआधी ते क्लाउड आणि एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष राहिले आहेत.
- मायक्रोसॉफ्टसह IBM देखील भारतीयांच्याच ताब्यात असून, आयबीएमचे अध्यक्ष आणि सीईओ अरविंद कृष्णा आहेत.
- कृष्णा यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले असून, ते फेडरल बँक ऑफ न्यूयॉर्कच्या संचालक मंडळावरही आहेत.
- Adobe च्या CEO पदी शंतनू नारायण
- शंतनू नारायण हे दिग्गज आयटी कंपनी Adobe चे CEO आहेत.
- 1998 मध्ये Adobe मध्ये रूजू होण्यापूर्वी नारायण यांनी 1986 मध्ये सिलिकॉन व्हॅली स्टार्ट-अप म्यजोरेक्स Automation system मध्ये काम केले आहे.
- यानंतर त्यांनी 1989 ते 1995 पर्यंत अॅपलसाठी काम केले.
- Vimeo च्या CEO पदाची जबाबदारी सध्या अंजली सूद यांच्याकडे असून, चॅनेलच्या सीईओ पदाची धुरा लीना नायर यांच्याकडे आहे.
- वरील कंपन्याशिवाय स्टारबक्सचे सीईओपदावरदेखील भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन आहेत.
- FedEx मध्येही भारतीयांचा डंका आहे. राज सुब्रमण्यम हे FedEx चे CEO आहेत. त्याचप्रमाणे Vmware चे CEO हे भारतीय वंशाचे रघु रघुराम आहेत.
- निकेश अरोरा हे पालो अल्टोचे सीईओ असून, Netapp च्या CEO पदावर भारतीय वंशाचे जॉर्ज कुरियन आहेत.
- गुगल क्लाउडची मालकी भारतीय थॉमस कुरियन यांच्याकडे असून, देविका बुलचंदानी या ओगिल्वीच्या सीईओ आहेत.
- जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखपदाची जबाबदारी जवळपास भारतीय नागरिकांच्या खांद्यांवर असून, त्यांच्या कार्यतून सर्वजण भारताचा आणि भारतीयांचा मान उंचावण्याचे काम करत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space