कुणबी युवा मुंबई यांच्या तर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-समाज परिवर्तनाचे शि ल्पकार, शिक्षणाचे प्रसारक आणि सामाजिक न्यायाचे पुर स्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा पिढीमध्ये त्यांचे विचार व कार्य पोहोचविण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांची वयोमर्यादा १५ ते २१ वर्षे अशी असून निबंध स्पर्धेसाठी स्वलिखित निबंध असावा. शब्द मर्यादा कमाल १००० शब्द इतकी असून  निबंध A4 आकाराच्या कागदावर स्पष्ट व सुवाच्य हस्ताक्षरात लिहावा.
  • निबंध PDF स्वरूपात दिनांक २६ जून पर्यंत  86930 81745 या व्हाट्सअप वर पाठवावी निबंधाचे परीक्षण विषयाची मांडणी,विचारांची स्पष्टता, भाषाशैली, सर्जनशी लता व ऐतिहासिक माहितीच्या अचूकतेच्या आधारे करण्यात येईल.
  • वक्तृत्व स्पर्धा रविवार दि.५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ :०० वाजता व चित्रकला स्पर्धाही याच दिवशी सकाळी ११.०० वाजता कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परळ (पूर्व) येथे होणार आहे.
  • चित्रकला स्पर्धेसाठी लहान गट – इयत्ता १ ली ते ४ थी,मो ठा गट – इयत्ता ५ वी ते ८ वी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी
  • १) राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि आजची युवा पिढी
  • २) राजर्षी शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे प्रणेते
  • ३) लोककल्याणकारी राजा : राजर्षी शाहू महाराज हे विषय ठेवण्यात आले आहेत.
  • स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी https://for ms.gle/6XgxLSZeQ6wXFLPE6 या गुगल फाॅर्म द्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • राजर्षी शाहू महाराजांच्या समता, शिक्षण आणि सामाजि क परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व पा त्र स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा अधिक माहि तीसाठी बारकू बेंडल सर  : 7021520080
  • शशांक रांगळे सर: 8450986492
  • शैलेश दळवी सर: 8850855117
  • पंकज पालकर सर 9221314272 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
  • असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई कुणबी युवा मुंबई प्रचार प्रसार विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles