खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; परंडा शहरात झळकले बॅनर्स, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-महाराष्ट्राच्या राजका रणात सध्या सुरू असलेल्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभू मीवर धाराशीव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर (ओमराजे) यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री एक नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) पक्षा त प्रवेश केला आहे.
  • ओमराजे यांच्या या थेट पक्षप्रवेशामुळे धाराशीव जिल्ह्या सह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
  • या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद परंडा शहरात उमटले असून, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत करणारे मोठे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत.
  • फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोष खासदार ओमरा जे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच परंडा शह रात महायुती आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या नगर अध्येक्ष जाकीर सोदागर सह नगर शेवक व शेकडो कार्य कर्ते उपस्वित होते.
  • कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात एकत्र येत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली आणि पेढे वाटू न जोरदार जल्लोष साजरा केला.
  • “विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्र श्न सोडवण्यासाठीच” हा निर्णय घेण्यात आल्याची भावना यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे लक्ष ओमराजेंच्या पुढील भूमिकेक डेमहाविकास आघाडीचे फायरब्रँड खासदार म्हणून ओळ खले जाणारे ओमराजे निंबाळकर आता सत्ताधारी पक्षात सामील झाल्यामुळे धाराशीव जिल्ह्याचा चेहरामोहरा बद लणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील रखडलेले विकास प्रकल्प आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक होते, अशी भूमिका ओमराजे यां नी त्यांच्या निकटवर्तीयांकडे मांडल्याचे समजते.
  • मंत्रिमंडळात स्थान मिळणार? नागरिकांमध्ये उत्सुकता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद मराठवाड्यात आणखी मजबूत झाली आहे.
  • या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता ओमराजे निंबा ळकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा राज्याच्या राजका रणात काही मोठे मानाचे स्थान दिले जाणार का…?
  • त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार का? अशी जो रदार चर्चा सध्या परंडा शहर आणि संपूर्ण धाराशीव जि ल्ह्यातील नागरिकांमधून आणि राजकीय विश्लेषकांमधून होत आहे. ओमराजेंच्या या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles