
ओम साई राम प्रा. लि.च्या नावाखाली ठरावासाठी आर्थिक आमिष…? जावेली खुर्द ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी.
- प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- एटापल्ली तालुक्यातील जा वेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध ग्राम कोस समित्यांचे ठराव बेकायदेशीररित्या मिळविण्यासाठी काही दलालांकडून आर्थिक आमिष दाखविले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
- या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर क ठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तह सीलदार, एटापल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- निवेदनानुसार, ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या नावाखाली काही व्यक्ती ग्राम कोस समितीतील मोज क्या सदस्यांना हाताशी धरून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- यासाठी आर्थिक प्रलोभने दाखविली जात असल्याचेही ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
- ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसभा व ग्राम कोस समि तीची दिशाभूल करून काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक हितासाठी कार्यरत असल्याची शंका निर्माण झाली आहे.
- गावाच्या विकासाशी संबंधित कोणताही निर्णय हा सर्व सदस्यांच्या सहभागातून आणि नियमानुसार होणे आवश्य क असताना काही जण नियमबाह्य पद्धतीने ठराव मिळ विण्याचा प्रयत्न करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नारा जी व्यक्त होत आहे.
- या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन साद र करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- तसेच ग्रामसभा आणि ग्राम कोस समितीच्या अधिकारांचे संरक्षण करून कोणताही बेकायदेशीर ठराव मंजूर होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
- निवेदन देताना सैनू लेकामी, नामदेव लेकामी, तनेश गोटा, नामसू हिचामी, बिरसा हेडो, मधुकर मट्टमी, रामसू नरोटे, प्रवीण लेकामी, रमेश हेडो, सचिन लेकामी, लालू पदा, झु रु तेलामी, मंगेश वड्डे, पेका लेकामी, अनिल काकडी, मंगू गोटा, लालू तेलामी, सत्तू झोरे, सत्तू तुमरेट्टी, सवजी झोरे, रावजी कोवसे, जीवन केरकेडा, वासूदेव हिचामी, भीमा पदा, मनोज गोटा, तोंदे तिम्मा, दिलीप लेकामी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






