
गिरगावच्या साहित्य संघात आज महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक चंदन कांबळे यांच्या उपस्थितीत “कलगी-तुरा” कलेचं आयोजन.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कोकणामध्ये पारंपरि क लोककला म्हणजे कलगीतुरा ही लोकप्रिय व समृद्ध लोककला आहे.
- कलगीतुरा म्हणजे सामुहिक नृत्य,गायन, शेरोशायरी, दर्जे दार काव्य, आणि शास्त्र पुराणातील सवाल जवाब यांनी सजलेला, रसिकांच्या पसंतीस उतरलेला लोककला प्रकार आहे.

- कोकणातील लोककलेचे जतन करण्यासाठी अखिल महा राष्ट्र कुणबी सेवा संघ,( रजि.) संलग्न कुणबी युवक आणि विभागीय शाखा/महिला विभाग व सांस्कृतिक विभाग यां च्या संयुक्त विद्यमाने बहारदार आयोजन करण्यात आले आहे.
- हा कार्यक्रम आज शनिवार दि.११ जुलै २०२६ रोजी रात्रौ ०८.०० वा.साहित्य संघ मंदिर,गिरगाव,चर्नी रोड ( मुंबई ) येथे संपन्न होत आहे.
- हा रंगतदार सामना अनोखी शैली असणारे आणि आप ल्या वक्तृत्वातून वैचारिक प्रबोधनाची मेजवानी देणारे लो कप्रिय कलगीवाले शाहीर शाहिद खेरटकर विरुद्ध एक उच्चशिक्षित,सुरांची बरसात करणारे लोकप्रिय तुरेवाले शाहीर ज्ञानदीप भोईनकर अशी लढत होणार आहे.
- सदरचा कार्यक्रम म्हणजे रसिकांची तृष्णा तृप्त करणारा, लोकसंस्कृती व लोकपरंपरेचे उत्तम दर्शन असेल. कोक णातील दोन्ही तुल्यबळ शाहिरांची जुगलबंदी पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे.
- या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक/संगीतकार चंदन कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
- अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी बापू ओकटे – ९००४३ ०७०७१/ दिपक कारकर – ९९३०५८५१५३ यांच्याशी संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






