
भोत्रा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारविरोधी आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे; गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशीचे लेखी आश्वासन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामांमध्ये लाखो रुप यांचा बोगस कारभार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुरू असलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिव शी मागे घेण्यात आले.
- गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) या प्रकरणाची १५ दिव सांत समितीमार्फत चौकशी करून पुढील कारवाई कर ण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आप ले आंदोलन मागे घेतले.

- भोत्रा गावातील ग्रामपंचायत कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप देशमुख व दत्तात्रेयगोळे यांनी दि. २२ जुलै २०२६ पासून प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते.

- आंदोलनाचा आज (दि. २४ जुलै) तिसरा दिवस होता. उ पोषणकर्त्यांची तब्येत आणि गावाची परिस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली.

- आज दुपारी रजिंद ज्ञानेश्वर पाटील यांनी गटविकास अधि काऱ्यांशी समन्वय साधून या प्रकरणात मध्यस्थी केली.

- त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलकांना लेखी आश्वासन पत्र सुपूर्द करण्यात आले.

- या पत्रात, “भोत्रा ग्रामपंचायतीच्या सर्व विभागांतील कामां ची पुढील १५ दिवसांत एका विशेष समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल.
- चौकशी अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदे शीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

- प्रशासनाच्या या लेखी भूमिकेनंतर उपोषणकर्त्यांनी समा धान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

- यावेळी रजिंद ज्ञानेश्वर पाटील, कृषी गटविकास अधिकारी शिंदे, ग्रामसेवक कावळे, ग्रामसेवक वैभव भांडवलकर यां च्यासह गावातील लहान-थोर नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






