
महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे उत्साहात ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी व वारकरी दिंडी सोहळा संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथे महात्मा गांधी शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून ग्रंथदिं डी, वृक्षदिंडी आणि वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहा त व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
- कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
- ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी विविध ज्ञानवर्धक पुस्तके, संविधा न,संत साहित्य आणि प्रेरणादायी ग्रंथांचे दर्शन घडवून “वा चन संस्कृती जोपासूया” हा संदेश दिला.

- वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी हातात रोपे घेऊन पर्यावरण संवर्ध न, वृक्षलागवड आणि निसर्ग संरक्षणाचा जागर केला. “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
- यानंतर पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगा च्या गजरात, अभंग व हरिनामाच्या जयघोषात वारकरी दिंडी काढली.
- विद्यार्थ्यांनी संतांच्या विचारांचा प्रसार करत भक्ती, समता, बंधुता आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
- या सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक काशीद सर, पर्यवेक्ष क प्रविण शेरे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्या र्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
- कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नियमित वाचन, पर्यावर ण संवर्धन आणि संतांच्या आदर्श विचारांचे आचरण कर ण्याची प्रतिज्ञा घेतली.
- या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि वारकरी परंपरे बद्दल आदर निर्माण झाला.
- संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






