डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शहरानजीकच्या मौजे शीळ गावचे माजी सरपंच व शिवसेना नेते रविंद्र ना गरेकर यांची डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्त रीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
  • रविंद्र नागरेकर यांनी शीळ गावचे सरपंच त्याचबरोबर शि वसेना गटप्रमुख ते उप विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, टेलिफोन सल्लागार कमिटीवर सदस्य म्हणून तसेच केंद्र सरकार पंचायतराज कमिटी, जिल्हा दक्षता समाज कल्या ण कमिटीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
  • तसेच केंद्रीय मंत्री प्रभू यांचे ते नऊ वर्षे प्रतिनिधी म्हणून राहिले आहे. राष्टीय व राज्य स्थरावर संस्था मध्ये काम केले आहे.
  • तर मधल्या काळात काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून त्याच बरोबर जिल्हा स्वाभिमान संघटना अध्यक्ष आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष तसेच सरचिटणीसपदावर काम केले आहे.
  • त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव ल क्षात घेवून पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामं त तसेच कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी त्यांची या समितीवर नियुक्ती केली आहे.
  • या सदस्य पदाच्या माध्यमातून डोंगरी भागातील प्रलंबीत विकास कामांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे श्री.नागरेकर यांनी सांगितले.
  • या नियुक्तीबद्दल त्यांचा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित, राजापूर यांच्या वतीने संस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स त्कार करण्यात आला.
  • यावेळी व्हा. चेअरमन प्रकाश लोळगे, यांसह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थितांनी रविंद्र नागरेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles