पुणे महामेट्रो व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेट्रो फीडर रिक्षा सेवा’चा अधिकृत उद्घाटन सोहळा संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- महापौर मा. श्री. रवी लांडगे यांच्या शुभहस्ते पीसीएमसी मेट्रो स्टेशनवर ‘मेट्रो फीडर रि क्षा सेवा’ दिमाखात सुरू; लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी अधि क सुलभ शेअरिंग व मीटर पद्धतीने सेवा उपलब्ध; ‘नो रिफ्युजल पॉलिसी’ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई.
  • पिंपरी-चिंचवड, दिनांक १७ ऑगस्ट २०२६: पिंपरी-चिंचव ड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वेगवा न, सुलभ, सुरक्षित व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्दिष्टा ने आज एक महत्त्वपूर्ण अधिकृत पाऊल उचलण्यात आले.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महामेट्रो व महारा ष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त सहकार्याने प्रवासी हितासा ठी ‘मेट्रो फीडर रिक्षा सेवा’चा अधिकृत उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे संपन्न झाला.
  • या सेवेचा शुभारंभ पिंपरी-चिंचवडचे महापौर मा.श्री.रवी लांडगे यांच्या शुभहस्ते झाला.
  • याप्रसंगी विधान परिषदेच्या आमदार मा. उमाताई खापरे, उपमहापौर सौ.शर्मिलाताई बाबर, महामेट्रोचे व्यवस्थाप कीय संचालक श्री.श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबा कांबळे, भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष व नगरसेवक शत्रुघन बापू काटे, प क्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक तुषार हिंगे, पिंपरी वाहतूक विभाग पो लीस निरीक्षक अमित डोळस, शहर अभियंता श्री.मनोज सेठीया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
  • सेवेचे स्वरूप व मार्ग
  • मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा शेअरिंग व मीटर अ शा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध करून देण्यात आली असून, खालील मार्ग निर्धारित करण्यात आले आहेत:
  • गेट क्र. १: घरकुल प्रकल्प, जाधववाडी, कुदळवाडी, चिख ली गाव, अजमेरा कॉलनी, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट, शाहुनगर.
  • गेट क्र. २: अंथिया सोसायटी, अजमेरा कॉलनी, मासुळक र कॉलनी, अंतरिक्ष कॉलनी, खराळवाडी, मोनिका अपार्ट मेंट, डी. वाय. पाटील कॉलेज.
  • गेट क्र.३ : पिंपरी गाव, चिंचवडगाव, तापकीर नगर, वाल्हे कर वाडी, निगडी, डीलक्स चौक, काळेवाडी ब्रिज, साई चौक, चाफेकर चौक.
  • रिक्षा चालकांसाठी अनिवार्य नियमावली
  • प्रवाशांना दर्जेदार व विनाव्यत्यय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी खालील कडक नियमावली लागू करण्यात आली आहे:
  • भाडे नाकारण्यास सक्त मनाई (No Refusal Policy): मेट्रो स्टेशनवर उपस्थित सर्व रिक्षा चालकांनी कोणत्याही प्रवाशाला भाडे नाकारू नये.
  • उल्लंघनाबाबत कारवाई:
  • नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना सेवा नाकारणाऱ्या चा लकांवर कायदेशीर तरतुदींनुसार तसेच संघटनेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल.
  • महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबा कांब ळे यांनी या उपक्रमाद्वारे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणा र असून, रिक्षाचालकांना हक्काचा व सन्मानजनक रोज गार उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
  • स्मार्ट व नागरिककेंद्रित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची पूर्ण साथ राहील, असेही त्यांनी नमूद केले.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम तांदळे, विजय ढ गारे, विशाल ससाने, धनंजय कुदळे, दीपक ताटे, सुरज सो नवणे, दत्ता गिल्ले, भाऊसाहेब शेलार, अशोक तात्या ठा कूर, संजय शिंदे, निशांत भोंडवे, गणेश कांबळे, सिद्धार्थ साबळे, पप्पू वाल्मिकी, अप्रोज कोतवाल, नामदेव मेहर, श्याम मोरे, शुभम वाल्मिकी, रोहन जोगदंड आणि राहुल हाके यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • निवेदक: डॉ. बाबा कांबळे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संपर्क: ९८५०७३२४२४
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles