
उद्या दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपळगाव बसवंत नगरीत निर्भय महाराष्ट्र पार्टीचा ३ रा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम.
- प्रतिनिधी : राजाराम खांगळ :-पिंपळगाव बसवंत: निर्भ य महाराष्ट्र पार्टी (महाराष्ट्र राज्य) नोंदणीकृत पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा उद्या, रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपळगाव बसवंत, बाबा लॉन्स येथे अत्यंत थाटामाटात साजरा होणार आहे.
- सत्याग्रह, निर्भय आणि संघर्ष या ब्रीदवाक्यासह जनताच मालक हा विचार पुढे नेणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रा तील सर्व निर्भय वीर सैनिकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे (सर)आबाजी बालादार, तुषार निकम (सर) संजय (मामा) शिंदे समाधान आहेर, शितलताई गोरे वैभव दादा बोरस्ते संतोष (भाऊ) सुरडकर आदी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

- पिंपळगाव बसवंत येथील बाबा लॉन्स येथे भव्य व्यासपी ठ व स्वागताध्यक्ष कमानी उभारण्यात आल्या असून का र्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
- गेल्या तीन वर्षांतील संघर्षाचा आढावा घेऊन आगामी का ळात जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार या वेळी केला जाईल.

- संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या निर्भय कार्यकर्त्यांचा आणि मान्यवरांचा विशेष सत्कार या व्यासपीठावर होणार आहे.
- उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आग्रहाचे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






