
भक्तीच्या नावावर चाललेल्या बाजारावर भाष्य करणारे निलेश उजाळ लिखित शाहीर प्रफुल्ल पुजारी यांचे नवे गीत रसिकांच्या भेटीला…!
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- गणरायाच्या भक्ती ला भावनेची आणि वास्तवाला शब्दांची जोड देत गीतका र निलेश उजाळ यांच्या लेखणीतून साकारलेले ‘भक्ती की बाजार’ हे सामाजिक आशयाचे नवे गीत आता LIVE झा ले आहे.
- आजच्या काळातील भक्ती, दर्शनव्यवस्था आणि सर्वसामा न्य भाविकांच्या मनातील प्रश्न यांना थेट शब्द देणाऱ्या या गीताला शाहीर प्रफुल्ल पुजारी यांनी आपल्या दमदार आ वाजाने सादर केले आहे.

- “भक्ती ही श्रद्धेची असावी व्यवहाराची नाही…!” या विचा राला केंद्रस्थानी ठेवून साकारलेले हे गीत रसिकांना निश्चि तच विचार करायला भाग पाडणारे आहे.
- हे गीत तुम्हाला ‘आम्ही कोकणी कलाकार’ या चॅनेलवर ऐकायला मिळेल.
- यंदाच्या गणेशोत्सवात लोकांना विचार करायला लावणारे हे गीत संगीत प्रेमी आणि गणेश भक्तांनी जरुर ऐकावे अ से आवाहन गीतकार निलेश उजाळ आणि गायक शाहीर प्रफुल्ल पुजारी यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






