अणसुरे भराडेवाडी दिवाबत्तीने उजळली…! ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने, स्वखर्चातून एकजूटीतून लिहिला नवा अध्याय.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- आपलं गाव म्हण जे केवळ घरांचा समूह नाही, तर आपली माणसं, आपली नाती, आपली संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडलेली आपली भावना आहे.
  • असेच भराडेवाडीला प्रकाशमय करण्याचे एक छोटेसे स्वप्न येथील ग्रामस्थांनी मनात रंगवले.
  • या उपक्रमासाठी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता, “आपल्या गावासाठी आपणच काहीतरी करूया” या भावनेतून गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.
  • आपल्या स्वखर्चातून सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था करून संपूर्ण वाडी प्रकाशमय करण्याचा संकल्प करण्यात आला.
  • हा उपक्रम केवळ दिवे आणि विद्युत खांब उभारण्याचा वि षय नाही. हा आपल्या गावाबद्दलच्या प्रेमाचा, एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रकाश आहे.
  • आज एखाद्या छोट्याशा वाडीतील काही माणसं एकत्र येऊन आपल्या परिसरासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यातून इतरांसाठीही एक सुंदर संदे श निर्माण होतो.
  • “सरकार काय करेल?” याची वाट पाहण्यापेक्षा “आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो?” हा विचार महत्त्वाचा आहे.
  • या उपक्रमामध्ये प्रत्येक घराचा, प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग मह त्त्वाचा आहे.
  • कारण गावाचा विकास हा केवळ काही व्यक्तींची जबाब दारी नसून संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे.
  • आज आपण आपल्या वाडीतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे उजळण्याचे स्वप्न पाहत आहोत.
  • उद्या याच एक जुटीतून शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण, पाणी, आरोग्य आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम उभे राहू शकतात.
  • एका दिव्याने अंधार दूर होतो; पण अनेक माणसं एकत्र आली तर संपूर्ण गाव उजळून निघते.
  • भराडेवाडीचा हा छोटासा प्रयत्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरावा‌‌ हीच अपेक्षा “प्रकाश फक्त रस्त्यावरचा नसावा, तो प्रत्येकाच्या मनातही निर्माण व्हावा.”
  • भराडेवा डीतील ग्रामस्थांनी स्वखर्चातून, स्वयंस्फूर्तीने स्वाभिमानाने आणि परस्परातील सहकार्याने लिहीलेला हा अध्याय भा वी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles