
शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरा करण्यास बंदी – जिल्हा परिषदेचे आदेश दीपक पाचपुते यांच्या मागणीमुळे..!
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- दि १० जुलै २०२५ ठिकाण अहमदनगर शासकीय कार्यालयातील शिस्त आणि सार्व जनिक संसाधनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद सुभा षलाल भंडारी (C.E.O.) यांनी दि. १० जुलै २०२५ रोजी एक महत्त्वाचा आदेश निर्गमित केला आहे.
- या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयी न वेळेत वाढदिवस, अभिनंदन, स्वागत वा निरोप समारंभ घेण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे.

- ही कारवाई ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूहाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक पाचपुते यांनी केलेल्या जनहित लेखी मागणीच्या अनुषंगाने कर ण्यात आली असून, त्यांचे यासाठी मोठे योगदान मानले जात आहे.
- मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आदेशात नमूद केले आहे की :
- “कार्यालयीन वेळ व संसाधनांचा वैयक्तिक उपयोग हा म हाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा(वर्तणूक) नियम १९६९ च्या विरोधात असून, यामुळे कार्यालयीन कार्यक्षमता व शिस्त बाधित होते.”
- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंग किंवा शास्तीची कार्यवाही केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
- श्री.दीपक पाचपुते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की:
- “शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या सेवा देण्याचे केंद्र, ते कोणाच्याही वैयक्तिक सोहळ्याचे ठिकाण नाही. हा आ देश म्हणजे जनहिताचा विजय आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो.”
- त्यांनी पुढे प्रशासनाला सूचना केली की,
- “या आदेशाची अंमलबजावणी निगरगट्ट होऊ नये, म्हणून सर्व कार्यालयांमध्ये पाळत समिती व चौकशी नोडल अधि कारी नेमावेत.”
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











