
माणुसकीचा हात…! 80 वर्ष भरकटलेली वृद्ध महिला घरी परतली.
- प्रतिनिधी : अहेरी : स्वरूप गावडे :-एटापल्ली तालुक्या तील अतिसवेंदनशील नक्षलग्रस्त सुरजागड नेंडेर येथील नामे चिन्नी बैरा जोई वय,80 वर्षे,नातेवाईकांच्या घरी निघा लेली परंतु रस्ता भरकटलेली वृद्ध महिला अनवानी पायां नी मागील चार दिवसापासून आलापल्ली येथील मन्नेवार कॉलनीत फिरत होती.
- त्या परिसरातील नागरिक जेवणाची व्यवस्था करून द्याय चे परंतु तिला फक्त माडिया भाषाच अवघत होती त्यामुळे सदर महिला कोणत्या गावातील आहे हे माहिती करून घेणे नागरिकांना कठीणच होते.

- त्या प्रसंगात नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत यांना माहिती देताच त्यांनी माणु सकीचा धाडस दाखवून सदर महिलेच्या व्हाट्सफ ग्रुपद्वारे शोध घेतला असता नेंडर गावातील निघाली.
- त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रोमीत तोम्बर्लावार यांना संपर्क साधून वाहनाची व्यवस्था करून देण्यासाठी विनंती केली लगेच त्यांनी तत्परतेने मदतकार्यास वाहन पाठविले असता तिला स्वगावी कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
- यावेळी रायुकाचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, हितेश कुळसंगे,आशु चापले भगवान गावडे, पाटाडी हिचामी, अ र्जुन आलाम,मंगेश पुंगाटी,रैजू हिचामी,संतोष उसेंडी,आदी उपस्थित होते, कुटूंबायांनी समाधान व्यक्त करत आभार मानले….!
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











