
वसई उपनिबंधक कार्यालयातील संजय ठाकरे यांच्याकडून स्वतःच्या RTI अर्जावर स्वतःच निर्णय घेतल्याचा बेकायदेशीर प्रकार….!
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- जनतेला माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळावी यासाठी शास नाने विविध स्पष्ट तरतुदी केल्या आहेत.
- मात्र, कार्यालय उपनिबंधक, सहकारी संस्था, वसई येथील सहकारी अधिकारी (श्रेणी -१) श्री. संजय ठाकरे यांनी स्वतःच्या वैयक्तिक बाबतीतील माहिती अधिकार अर्जावर स्वतःच निर्णय देत कायद्याची सरळसरळ पायमल्ली केली आहे.

- असा गंभीर आरोप पालघर जिल्ह्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्याध्यक्ष आणि पत्रकार श्री.अनंत पुंडलीक पाटील यांनी केला आहे.
- श्री. पाटील यांनी दिनांक २६/०६/२०२५ रोजी कार्यालय उपनिबंधक, वसई येथे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत एक अर्ज (आवक क्र. ११८) सादर केला होता.
- सदर अर्जावर श्री.संजय ठाकरे यांनी दि. २१/०७/२०२५ रोजी जा.क्र. ३०२१ अन्वये स्वतःच निर्णय दिला. हे कृत्य शासन निर्णय दिनांक ०७/०९/२०१६ च्या स्पष्ट आदेशा विरोधात असून हितसंबंधित निर्णय ठरतो.
- शासन निर्णयात स्पष्ट नमूद आहे की, “वैयक्तिक माहिती च्या प्रकरणात संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याने स्वतः निर्णय घेऊ नये.
- सार्वजनिक प्राधिकरणाने इतर जन माहिती अधिकारी किं वा प्रथम अपील अधिकाऱ्याची नियुक्ती करून निर्णय द्यावा.”
- तरीही श्री.ठाकरे यांनी संबंधित कायदेकानूचा अभ्यास न करता,अथवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा निर्णय दिला.
- श्री. पाटील यांनी याबाबत तीव्र हरकत घेत लेखी पत्राद्वारे खालील मागण्या केल्या आहेत.
- 1. सदर प्रकरणात त्वरित इतर स्वतंत्र आणि सक्षम जन माहिती अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.
- 2. नव्याने नियुक्त अधिकाऱ्याद्वारे अर्ज क्रमांक ११८ वर कायदेशीर निर्णय दिला जावा.

- 3. श्री. संजय ठाकरे यांना माहिती अधिकार कायदा व शा सन निर्णय याबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, जे णेकरून भविष्यकाळात अपुरे, चुकीचे किंवा दिशाभूल करणारे पत्रव्यवहार होणार नाहीत.
- “आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या अर्जावर स्वतःच निर्णय देणे म्हणजे निष्पक्षतेचा अपमान आहे. असा गैरप्रकार रो खण्यासाठी वेळेत आणि ठोस शासकीय पावले उचलली गेली पाहिजेत,” असे श्री. पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











