‘स्वराज्य रवी ‘ हे नाटककार ला.कृ.आयरे यांचे नाटक नव्या स्वरूपात रंगभूमीवर येणार…!

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- रिंगणे गावचे सुपुत्र आणि कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार ला. कृ. आयरे यांच्या नाट्यकृतींनी कामगार रंगभूमीला भूरळ घातली होती.
  • सिनेमा क्षेत्रात बोलपटांनी प्रवेश केला. सुरेख संगिताचा मेळ साधत उत्तमोत्तम गाणी बोलपटात आल्याने मराठी संगीत नाटकांचा प्रेक्षक कमी झाला.
  • त्याचा एकंदर परिणाम व्यावसायिक रंगभूमीवरही मात्र त्याच दरम्यान गिरणगावात स्वस्तिक नाटक मंडळी या संस्थेकडून फिर्याद,कसोटी,जुलूम ,शेतकरी दादा अशी कोकणच्या मातीचा सुगंध घेऊन आलेली नाटके सादर होऊ लागली आणि मराठी रंगभूमी नवी कळा आली.
  • लेखक, दिग्दर्शक,अभिनेता आणि आणि निर्माता अशा सर्व भुमिकेतून काम करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरे यांना एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली कि त्यांच्या नाट्य पु स्तकाच्या अनेक आवृत्त्या काढाव्या लागल्या.
  • कोकण, पश्चिम महाराष्ट्र,गोवा आणि नागपूर कडच्या भा गातील गावोगावच्या नाट्यसंस्था त्यांच्या नाटकांचे प्रयोग करीत असत.
  • त्यांची नाटकाची 23 पुस्तके प्रकाशित झाले असून त्यांचे सर्वच विषय सामाजिक प्रश्नांवरती वाचा पण नावे आहेत मात्र एकमेव ऐतिहासिक नाटक लिहिले गेले ते म्हणजे ‘ स्वराज्य रवी.’ नाटक संस्कृतीचा इतिहास पाहता सुरुवाती च्या काळातील नाटके रात्री लवकर सुरू झालेली नाटके सकाळी उजाडेपर्यत चालत.
  • त्याकाळी पांच अंकी नाटक म्हणजे पाच ते सहा तास हा खेळ चाले.मात्र पुढे बदल होऊन तीन अंकी संहिता लिहि ल्या जाऊ लागल्या.
  • स्त्रीपात्रे सुद्धा तीन चार अशा संख्येत असत. तो ही आता मागे पडला आणि प्रेक्षक दोन अडीच तासापेक्षा जास्त वे ळ बसत नाहीत हे लक्षात घेऊन दोन अंकी नाटकांची परं परा रुढ झाली आहे.
  • नाटककार ला.कृ.आयरे यांच्या स्वराज्य रवी हे नाटक ती न अंकी असल्याने त्याचे प्रयोग होत नव्हते.
  • म्हणून नाटककार ला.कृ.आयरे स्मृती ट्रस्टचे सरचिटणीस सुभाष लाड यांनी मुंबईतील महालक्ष्मी कला मंच कडे हे नाटक दोन अंकी स्वरूपात रंगमंचावर आणण्याची विनं ती केली.
  • महालक्ष्मी कला मंच की कोकणातल्या तरुण कलाकारां नी ऐतिहासिक नाटकांसाठी निर्माण केलेली संस्था असून गेल्या सात वर्षात वीर शिवाजी, वीर रत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकांचे पन्नासच्यावर प्रयोग केलेले आहेत.
  • त्यांनी स्वराज्य रवी या नाटकाला दोन अंकात आणून या नाटकाच्या तालमींना सुरुवात केली आहे. लवकरच मुंब ईत शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
  • श्री महालक्ष्मी कला मंचने आपला सातवा वर्धापन दिन पवई येथे साजरा केला त्यानिमित्ताने स्वराज्य रवी या नाट काच्या मुखपृष्ठाचे अनावरण श्री सुभाष लाड यांच्या हस्ते केले.
  • त्यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्री प्रकाश लाड, संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश मांडवकर, उपाध्यक्ष श्री आत्माराम बाचिम हे उ पस्थित होते.‌ कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते श्री प्रदीप रेवा ळे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles