
बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण खैरे यांना ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पुणे येथील महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने दिला जाणा रा मानाचा ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार – २०२६’ परंडा तालुक्या तील बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री.नारायण मारुती खैरे यांना जाहीर झाला आहे.
- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आ णि अविरत कार्याचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.

- श्री.नारायण खैरे यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी केंद्रित उप क्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
- विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेऊनच महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी, पुणे यांनी त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
- हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बावची विद्यालयाचे शि क्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ आणि शिक्षण वर्तु ळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- या पुरस्कारामुळे परंडा तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून श्री.नाराय ण खैरे यांचे कौतुक केले जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






