
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार; आमदार रोहित पवार यांचे नांदेडमध्ये आश्वासन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- “पत्रकार हा समा जात ‘जागल्या’ची भूमिका पार पाडत असतो. मात्र, कर्त व्यावर असताना त्यांना अनेक अडचणी आणि संकटांना सामोरं जावं लागतं.
- राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक असून, त्यांच्या संरक्षणासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
- या न्यायासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात मी पु न्हा एकदा आक्रमकपणे आवाज उठवेन,” असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी येथे दिले.

- नांदेड दौऱ्यावर असताना ‘पत्रकार हल्ला विरोधी कृती स मिती’च्या प्रतिनिधींनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
- यावेळी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आणि त्यांच्यावर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
- कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी
- गेल्या काही काळापासून राज्यात विविध ठिकाणी पत्र कारांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
- या पार्श्वभूमीवर, पत्रकारांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी विद्यमान ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ ची कडक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पवार यांच्याकडे केली.
- तसेच, या गंभीर मुद्द्यावर विधिमंडळात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधण्याची विनंतीही त्यांनी केली.
- पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार: रोहित पवार
- या मागणीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी पत्र कारांच्या भावनांशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले.
- ते म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आ पले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यावर होणारे हल्ले म्ह णजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा आहे.
- यापूर्वीही मी विधानसभेत या विषयावर भूमिका मांडली आहे आणि यापुढेही पत्रकारांच्या हक्कासाठी आणि त्यां च्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहीन.”
- या भेटीदरम्यान पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






