
कूकडगाव येथे पाणीटंचाईची शासकीय स्तरावरून पाहणी; गटविकास अधिकारी गायकवाड यांची भेट.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कूकडगाव येथे जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईची परंडा पं चायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) गायकवाड साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

- पाणी टंचाईची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी, यासाठी प्रशासनाकडून ही तातडीची पावले उचलण्यात आली आहेत.
या पाहणी दौऱ्यादरम्यान गटविकास अधिकारी गायकवा ड यांनी गावातील पाण्याचे मुख्य स्त्रोत, विहिरी आणि पा णीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली.
- तसेच गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजू न घेतल्या.

- गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी ता त्पुरत्या व कायमस्वरूपी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले.

- या पाहणीच्या वेळी कूकडगावचे माजी सरपंच आमीर भा ई यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- आमीर भाई व नागरिकांनी गावातील पाणीटंचाईची भीष णता प्रशासनासमोर मांडली आणि तात्काळ टँकर सुरू करण्याची किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली.

- प्रशासनाच्या वतीने या समस्येवर सकारात्मक आणि वेगा ने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गटविकास अधि कारी गायकवाड यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले.

- या दौऱ्यामुळे कूकडगावच्या पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






