पाटील घराण्याचा ऐतिहासिक राजकीय वारसा: लोक नेते बाबूराव पाटील यांच्या मार्गदर्शनात एकाच कुटुंबात आजि माजि ६ आमदार….!

  • प्रतिनिधी : परंडा फारूक शेख :- महाराष्ट्राच्या राजकी य पटलावर अनेक दिग्गज राजकीय घराणी आणि त्यां च्यातील नातेसंबंधांची नेहमीच चर्चा होत असते.
  • मात्र, सध्या सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकार णात लोकनेते बाबूराव पाटील आणि माजी आमदार राज न पाटील यांच्या पाटील परिवाराच्या राजकीय प्रभावाची मोठी चर्चा सुरू आहे.
  • या घराण्याचा ऐतिहासिक वारसा आणि सध्याच्या पिढी तील अनोखा नातेबंधांचा योग प्रिंट मीडिया आणि राज कीय वर्तुळात कौतुकाचा विषय ठरला आहे.
  • लोकनेते बाबूराव पाटील (माजी आमदार) यांच्या समृद्ध राजकीय वारशाचा विस्तार आजच्या घडीला तब्बल पाच आजी-माजी आमदारांच्या रूपाने महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे.
  • यात सर्वात दुर्मिळ आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, माजी आमदार राजन पाटील यांच्या अनोख्या नातेबंधांमुळे ‘मा मा’ या पदवीला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच आणि वजनदार वलय प्राप्त झाले आहे.
  • सध्या राजन पाटील यांचे तीन सख्खे भाचे आणि एक भा चे-जावई असे एकूण चार आमदार विधिमंडळात कार्यरत आहेत.
  • राजन पाटील यांचे ३ सख्खे भाचे (आमदार): डॉ.प्रतापसिंह पाटील:
  • मराठवाड्यातील सुशिक्षित आणि पदवीधरांचे प्रतिनिधि त्व करणारे डॉ.प्रतापसिंह पाटील हे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत.
  • त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. विजयसिंह पंडित:
  • बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्यां नी आपल्या राजकीय कर्तृत्वाने आणि लोकसंपर्काने एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
  • ते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव आणि मा जी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू आहेत. पंडित आ णि पाटील घराण्याचा हा राजकीय संगम बीडच्या राजका रणात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
  • डॉ. राहुल पाटील:
  • परभणी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रति निधित्व करत त्यांनी परभणी शहरात व जिल्ह्यात आप ल्या आक्रमक आणि विकासाभिमुख कामाचा एक वेगळा च वेगवान ठसा उमटवला आहे.
  • भाचे-जावईही आमदार:  राजेश विटेकर:
  • राजन पाटील यांच्या तीन सख्ख्या भाच्यांशिवाय, त्यांच्या नात्यातील भाचे-जावई राजेश विटेकर हे देखील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहेत.
  • प्रिंट मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
  • लोकनेते बाबूराव पाटील यांनी लावलेले हे राजकीय रोपटे आज एका महावृक्षाच्या रूपात विस्तारले आहे.
  • माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए काच वेळी कुटुंबातील आणि जवळच्या नात्यातील ३ स ख्खे भाचे आणि १ भाचे-जावई (एकूण आमदार) विधिमं डळात कार्यरत असणे, हा संसदीय राजकारणातील अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक योगायोग मानला जात आहे.
  • ‘मामा’ म्हणून राजन पाटील यांनी जपलेले हे नातेसंबंध आणि सर्व भाच्यांनी आपापल्या मतदारसंघात निर्माण केलेले निर्विवाद वर्चस्व यामुळेच सध्या संपूर्ण महाराष्ट्रा च्या माध्यम विश्वात आणि राजकीय कॉरिडोअरमध्ये या पाटील घराण्याच्या ‘पॉवर’ची जोरदार चर्चा रंगली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles