
कुंभेफळ येथे २ नोव्हेंबरला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पुणे येथील सुप्रसि द्ध एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (महमदवाडी, हडपसर) यांच्या वतीने कुंभेफळ येथे भव्य नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
- हे शिबिर सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सका ळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत तुळजाभवानी मंदिर, कुंभेफळ येथे पार पडणार आहे.

- या शिबिरामध्ये रुग्णांची केवळ २० रुपये नाममात्र फी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी केली जाईल.
- तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदा न होईल, त्यांच्यावर एच. व्ही. देसाई रुग्णालयात लेन्स (भिंग) टाकून मोफत शस्त्रक्रिया (ऑपरेशन) केली जाणा र आहे.
- तसेच, डोळ्यावरील पडदा आणि लासरू (डोळ्यावरील टीक) यांसारख्या इतर आजारांवर अत्यंत सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रिया केली जाईल.
- शिबिरस्थळी रुग्णांना चांगल्या दर्जाचे नंबरचे चष्मे अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिले जातील.
- एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने कुंभेफळ आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आ हे की, त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
- शिबिराला येताना रुग्णांनी आपला मोबाईल फोन सोबत आणणे अनिवार्य आहे.
- शिबिराचा सविस्तर तपशील:
- स्थळ : तुळजाभवानी मंदिर, कुंभेफळ
- दिनांक : २ नोव्हेंबर २०२६ (वार: सोमवार)
- वेळ : सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत
- फी : नेत्र तपासणी फक्त २० रुपये (मोतीबिंदू ऑपरेशन पूर्णपणे मोफत)
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






