
मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा…! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण; रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-देशातील विविध भागां तील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत अस ल्याचे चित्र समोर येत आहे.
- विशेषतः मुंबईमध्ये उपचारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप ऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी मोठी धाव पळ करावी लागत आहे.
- रक्ताच्या एका पिशवीसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक रक्त पेढ्यांचे उंबरठे झिजवत आहेत.
- मात्र रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांच्या ना तेवाईकांना निराश होऊन परतावे लागत आहे. ही परिस्थि ती केवळ रुग्णांसाठीच नव्हे, तर रक्तपेढ्या आणि रक्तदा त्यांसाठीही चिंतेचा विषय बनली आहे.
- रक्ताची गरज असल्याचे सांगणारे अनेक फोन कॉल, व्हॉ ट्सॲप संदेश आणि सोशल मीडिया पोस्ट रक्तदात्यांपर्यंत सातत्याने पोहोचत आहेत.

- मात्र मागणीच्या तुलनेत रक्त उपलब्ध नसल्याने रक्तदाते असूनही अनेक वेळा मदत करणे शक्य होत नाही. रक्तदा नासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या रक्तदात्यांनाही सध्या अ सहाय्यतेची भावना जाणवत आहे.
- दिवाळीच्या सुट्ट्यांचा रक्तसाठ्यावर परिणाम, थॅलेसेमि या आणि कर्करोग रुग्णांसमोर मोठे संकट – डॉ.प्रमेश सी.एस. –
- दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे आयो जन आणि नियमित रक्तदानावर मोठ्या प्रमाणात परिणा म झाल्याचे दिसून येत आहे.
- सणासुदीच्या काळात अनेक नियमित रक्तदाते गावी किं वा बाहेरगावी जातात. परिणामी रक्तदानाचे प्रमाण कमी होते.
- मात्र रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज सुट्ट्यांमध्येही कायम असते. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामधील अंतर वाढत आहे.
- टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमेश सी. एस. यांनीदेखील ‘X’ या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करू न रक्ताच्या तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
- या समस्येचा परिणाम केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून दे शातील विविध रुग्णालयांमध्येही रक्ताची कमतरता जाण वत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
- येत्या काळातही या परिस्थितीचा परिणाम अधिक जाणव ण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- रक्ताचा तुटवडा सर्वाधिक गंभीरपणे जाणवत आहे तो थॅ लेसेमिया, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवर उपचा र घेणाऱ्या रुग्णांना.
- थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यक ता असते.
- कर्करोगावरील उपचार, मोठ्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण आणि प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परि स्थितींमध्येही रक्ताची आवश्यकता भासते.
- अशा वेळी वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या उप चारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.
- त्यामुळे रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून अनेक रुग्णांच्या आयुष्याशी जोडलेली एक महत्त्वाची जबाबदा री आहे.
- विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानात सहभागी व्हावे.स्वतः – MSW श्री. भीमराव काळे –
- रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे रक्तपेढ्यांनाही अनेक मर्या दांचा सामना करावा लागत आहे. रक्त उपलब्ध नसताना रक्तपेढीतील कर्मचारी रुग्णांना रक्त देऊ शकत नाहीत.
- त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा राग अने कदा रक्तपेढ्यांमधील कर्मचाऱ्यांवर निघतो. याबाबत प ल्लवी ब्लड सेंटरचे MSW प्रभारी श्री.भीमराव काळे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
- ते म्हणाले, “सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तपेढ्यांवर मोठा ताण आहे. रक्त उपलब्ध नसताना रक्त पेढीतील कर्मचारीदेखील काही करू शकत नाहीत.
- त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांवर राग काढ ण्याऐवजी स्वतः पुढाकार घ्यावा.
- ज्या रुग्णालयात आपले रुग्ण उपचार घेत आहेत, त्या रु ग्णालयातील रक्तपेढीमध्ये किंवा मुंबईतील इतर अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये जाऊन स्वच्छिक रक्तदान करावे.
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र व्यक्तींनी वैद्यकीय तपास णीनंतर रक्तदानासाठी पुढे यावे. विशेषतः तरुणांनी मो ठ्या प्रमाणात रक्तदानात सहभागी व्हावे.
- स्वतः रक्तदान करण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारातून आणि परिचितांमधून नवीन रक्तदाते निर्माण करावेत. रक्तदानाबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.”
- मंदिरांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करा; नेते, मंत्री आणि कलाकारांनीही पुढाकार घ्यावा! – श्री.अनिल गरे – रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी समाजाती ल प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सदस्य आणि सक्रिय रक्तदान शिबिरांचे आयोजक श्री.अनिल गरे यांनी यासंद र्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
- ते म्हणाले, “ज्या मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भा विकांची गर्दी होते, अशा ठिकाणी योग्य परवानग्या घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले पाहिजे.
- धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांबरोबर रक्तदानाचा संदेश पोहोचवला पाहिजे. लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री तसेच चित्रपट आणि कला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनीही रक्तदा नात सक्रिय सहभाग घ्यावा.
- त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला, तर अनेक तरुण आणि नागरिक प्रेरित होतील.”
- तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे – रक्तदाते श्री.निलेश कोकमकर –
- रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे रक्तदाते श्री.नि लेश महादेव कोकमकर यांनीही या गंभीर परिस्थितीबाब त चिंता व्यक्त केली आहे.
- ते म्हणाले, “रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे नातेवाईक आज मदतीसाठी अनेक ठिकाणी फोन करत आहेत. रक्त दाते म्हणून आम्हालाही अनेक फोन आणि संदेश येत आहेत.
- एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज आहे, हे समजल्यावर त्या ला मदत करण्याची प्रत्येक रक्तदात्याची इच्छा असते.
- परंतु रक्तपेढ्यांमध्येच रक्त उपलब्ध नसेल, तर आम्ही तरी मदत कशी करणार? ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे.
- आज कोणाला रक्ताची गरज आहे, उद्या ती गरज आप ल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीलाही भासू शकते.
- त्यामुळे रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर रक्तदाते शोध ण्यापेक्षा गरज निर्माण होण्यापूर्वीच समाजात रक्तदाते निर्माण करणे आवश्यक आहे.
- मुंबईकरांना माझी हात जोडून विनंती आहे की, प्रत्येक तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे.
- केवळ स्वतः रक्तदान करून थांबू नका, तर आपल्या कि मान पाच मित्रांना रक्तदानासाठी प्रेरित करा. आपल्या सोसायटीत, कार्यालयात, मित्रमंडळात आणि सामाजिक संस्थांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करा.

- आपले एक रक्तदान एखाद्या गरजू रुग्णासाठी जीवनदान ठरू शकते.
- ” मुंबईतील विविध सामाजिक संस्था, मंडळे, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, कॉर्पोरेट कार्यालये, गृहनिर्माण संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अधिकृत रक्तपे ढ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






