
जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन.
- प्रतिनीधी : कांदिवली : प्रमोद तरळ :- जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने कांदिवली पूर्व येथील दामू नगर परिसरात दत्त मंदिर येथे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘FUN WITH LEARN’ या सहा महिन्यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
- मुलांना खेळातून शिकता यावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि त्यांच्यातील विविध कलागुण ओ ळखून त्यांना योग्य संधी मिळावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी सांगितले.

- सामान्यतः कोणत्याही कार्यक्रमाचे उद्घाटन रिबीन कापू न केले जाते. मात्र,जहान फाउंडेशनच्या वतीने या प्रकल्पा चे उद्घाटन एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
- यावेळी मुलांना रंगीत कागद देऊन त्यापासून कागदी विमाने तयार करण्यास सांगण्यात आले.
- तसेच मोठ्या कार्डपेपरपासून एक विमान तयार करून त्यावर मुलांची स्वप्ने आणि इच्छा लिहिण्यात आल्या. हे विमान प्रकल्पाच्या बॅनरजवळ लावण्यात आले.
- त्यानंतर मुलांनी आपापली छोटी विमाने हवेत उडवली. ए का लहान मुलाच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रक ल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
- मुलांच्या स्वप्नांना नवी भरारी देण्याचा सुंदर संदेश या उप क्रमातून देण्यात आला,अशी माहिती फाउंडेशनच्या खजि नदार श्वेता पाटील यांनी दिली.
- या सहा महिन्यांच्या प्रकल्पामध्ये मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सोबतच विविध सांस्कृतिक आणि कला त्मक गोष्टी शिकवण्यात येणार आहेत.
- यामध्ये नृत्य, नाटक, पथनाट्य अशा विविध कलांचा समा वेश आहे.मुलांची आवड आणि त्यांच्यातील कौशल्य ओ ळखून त्यांना त्या क्षेत्रात शिकण्याची संधी दिली जाणार आहे.
- AI विषयाचे मार्गदर्शन फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक म हेश सोनावणे करणार असून, सचिव अस्मिता कहाळे मुलांना नृत्य, नाटक, पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती फाउंडेशन चे सचिव अस्मिता कहाळे यांनी दिली.
- या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उज्ज्वल स्वावलंबी फाउंडेशनचे संस्थापक जितेश शरणागत, उज्ज्वल फाउंडे शनच्या अध्यक्षा वर्षा शरणागत, श्रीक्षा फाउंडेशनच्या सं स्थापक व सामाजिक कार्यकर्त्या मनिषा कटरमल, भीमा ई मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा आम्रपाली काळे आणि धम्म वर्गाचे सहाय्यक कदम सर उपस्थित होते.
- तसेच इस्क्रा फाउंडेशनचे संस्थापक हरिश्चंद्र देसले आणि चेतन कांबळे यांचीही विशेष उपस्थिती होती, अशी माहि ती फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक महेश सोनावणे यांनी दिली.
- या प्रकल्पाच्या माध्यमातून दामू नगर परिसरातील मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची, स्वतःमधील कला ओळखण्या ची आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.
- केवळ पुस्तकी शिक्षण न देता खेळ, कला, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास घ डवण्याचा फाउंडेशनचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, असे फाउंडेशनचे बोर्ड मेंबर पवन जोहारे यांनी सांगितले.
- प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी कला आणि एक वेगळे स्वप्न असते.
- त्या स्वप्नांना योग्य दिशा आणि संधी मिळाली, तर प्रत्येक मूल नक्कीच मोठी भरारी घेऊ शकते, असा विश्वास फाउं डेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर राहुल बनसोडे यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






