
शाळेच्या आवारात मृत्यूचा सापळा! ४४० व्होल्टच्या धोकादायक वीज तारा तात्काळ ..!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कुंभेजा (ता. परंडा)l येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातून गेले ल्या महावितरणच्या ४४० व्होल्ट क्षमतेच्या धोकादायक वीज तारांमुळे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवि ताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
- एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासना ला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करत या धोकादायक वीज तारा तात्काळ हटविण्याची आक्रम क मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शिवा जी पांडुरंग करळे यांनी केली आहे.

- कुंभेजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारा तून महावितरणच्या ४४० व्होल्ट क्षमतेच्या वीज तारा गेल्या आहेत.
- विशेष म्हणजे, शाळेच्या आवारातून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली जात असताना या तारा वाहनांना घासून तुटत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
- त्यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- दुर्घटनेची वाट पाहताय का?
- शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे ठिकाण असते; मात्र याच शाळेच्या आवारात धोकादायक वीज तारांचा मृत्यूचा सापळा निर्माण झाला असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
- तारा तुटून एखाद्या विद्यार्थ्याला विजेचा धक्का लागला किंवा जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल शिवाजी करळे यांनी उपस्थित केला आहे.
- या गंभीर समस्येकडे संबंधित विभागांनी गांभीर्याने लक्ष देऊन सहकार्य करावे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






