माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी कोकण खंडपीठात सर्वसामान्यांसाठी खुली.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- मुंबई, दि. 16: महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने माहिती अधिकार अधिनियमांतर्गत दाखल केलेल्या अपिलांवरील सुनावणी आता सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे.
  • त्यामुळे माहिती अधिकार प्रक्रियेत अधिक पारदर्शकता ये ण्यास मदत होईल, असा विश्वास कोकण खंडपीठाचे रा ज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.
  • राज्य माहिती आयोगाच्या 6 ऑक्टोबर 2023 रोजी झाले ल्या बैठकीत माहिती अधिकार अधिनियम,2005 च्या क लम 15(4) नुसार अपिलांवरील खुल्या सुनावणीस मान्य ता देण्यात आली होती.
  • त्यानुसार, कोकण खंडपीठातील राज्य माहिती आयोगा च्या दालनात होणाऱ्या द्वितीय अपिलांवरील सुनावण्या 16 जून, 2025पासून सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
  • खुल्या सुनावणीस उपस्थित राहण्यासंदर्भात काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत.
  • प्रत्यक्ष सुनावणीमध्ये फक्त अपीलकर्ता/तक्रारकर्ता, जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी किं वा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच बोलण्याची किंवा स हभाग घेण्याची परवानगी असेल.
  • उपस्थित इतर व्यक्तींना किंवा नागरिकांना सुनावणी प्रक्रि येत थेट बोलण्याची किंवा त्यात सहभाग घेण्याची परवान गी नसेल.
  • त्यांची उपस्थिती केवळ अभ्यागत (Visitors) म्हणून अ सेल. त्यांनी राज्य माहिती आयुक्त किंवा पीठासीन अधि काऱ्यांचा सन्मान राखणे बंधनकारक असेल.
  • अपीलकर्ता किंवा त्यांचे प्रतिनिधी, प्रतिवादी किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि इतर सर्व व्यक्तींना त्यांचे भ्रमणध्वनी बंध ठेवणे बंधनकारक असेल.
  • सुनावणी प्रक्रियेचे ध्वनिचित्र मुद्रण करता येणार नाही. अ पील किंवा तक्रारीसंदर्भातील प्रकरणांत व्यक्तिगत माहि तीचा समावेश असल्यास अशा प्रकरणांमध्ये राज्य माहि ती आयुक्त किंवा पीठासीन अधिकारी त्रयस्थ व्यक्तींना प्रवेश नाकारू शकतील.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles