परांडा तालुक्यात भारत गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट…? सर्व्हे पावतीवरील रकमेत खाडाखोड करून जादा वसुलीचा आरोप

  • प्रतिनिधी : परांडा : फारूख शेख :- परांडा तालुक्यात भारत पेट्रोलियमच्या घरगुती गॅस (LPG) एजन्सीमार्फत राबवल्या जाणाऱ्या सुरक्षितता तपासणी (Safety Surv ey) मोहिमेत ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
  • सर्व्हेच्या अधिकृत पावतीवर असलेल्या मूळ रक्कमेवर खाडाखोड करून ग्राहकांकडून जादा पैसे उकळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
  • नेमका प्रकार काय....?
  • मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीमार्फत घरोघरी जा ऊन गॅस जोडणीची तपासणी केली जात आहे. नियमानु सार या तपासणीचे ठराविक शुल्क कंपनीने निश्चित केले आहे.
  • मात्र,परांडा येथील एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांना देत अस लेल्या पावतीवर मूळ किंमत खोडून त्या जागी हाताने जा स्त रक्कम लिहित असल्याचे दिसून आले आहे.
  • अनेक सुज्ञ ग्राहकांनी यावर आक्षेप घेतला असता, कर्मचा ऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
  • ग्राहकांमध्ये संताप
  • “गॅस एजन्सीने आधीच गॅस सिलिंडरचे दर वाढलेले अस ताना, आता सर्व्हेच्या नावाखाली ही नवी लूट सुरू केली आहे.
  • पावतीवर खाडाखोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून, अधिकृत रक्कमेपेक्षा ५० ते १०० रुपये जास्त घेतले जात आहेत,” अशी तक्रार एका त्रस्त ग्राहकाने केली आहे.
  • प्रशासनाकडून कारवाईची मागणी
  • या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरीब ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
  • भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक तहसील प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित एजन्सीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परांडा शहरातील व तालुक्यातून नागरिकांकडून होत आहे.
  • काय काळजी घ्यावी….?
  • गॅस सर्व्हेच्या पावतीवर कंपनीची छापील किंमत तपासा.
  • जर पावतीवर खाडाखोड असेल तर पैसे देण्यास नकार द्या.
  • अशा प्रकारची फसवणूक होत असल्यास भारत गॅसच्या अधिकृत तक्रार निवारण पोर्टलवर किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles