
धोपेश्वर गणातून पंचायत समिती सदस्यपदासाठी श्री. अरविंद लांजेकर यांचा अपक्ष अर्ज दाखल.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- धोपेश्वर पंचायत समिती गणातून राजापूर पंचायत समिती सदस्यपदासाठी श्री.अरविंद लांजेकर यांनी आज मंगळवार, दि. २१ जाने वारी २०२६ रोजी सकाळी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
- हा अर्ज त्यांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडे सादर केला.
- अर्ज दाखल करताना धोपेश्वर पंचक्रोशीतील अनेक प्रति ष्ठित नागरिक,व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- यावेळी आंबा व्यवसायातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री. भगवान (शेठ) सावंत, रत्नागिरी जिल्ह्यातील केमिस्ट व्यवसायातील प्रसिद्ध व्यावसायिक श्री.प्रफुल लांजेकर, गोठणे-दोनिवडे येथील राजापूर तालुक्यातील व्यावसायिक श्री.अशफाक मापारी, पाचलचे श्री.समीर खानविलकर, श्री.मंगेश पांचाळ दोनिवडे, माजी सरपंच श्री.दीपक बेंद्रे आदींसह विविध गावांतील नागरिक उप स्थित होते.
- अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावर ण दिसून येत होते.
- राजापूर शहरालगत असल्याने धोपेश्वर पंचायत समिती गणाकडे नेहमीच सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते.
- या गणामध्ये सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय दृ ष्ट्या महत्त्व असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
- सद्यस्थितीत श्री. लांजेकर यांचे सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असून ते राणे कुटुंबी यांचे कट्टर व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
- तसेच आमदार निलेश राणे यांचे विश्वासू सहकारी व आम दार किरण सामंत यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.
- श्री.लांजेकर हे निर्भीड, बेधडक आक्रमकपणे आणि सर्व सामान्यासाठी निस्वार्थी,प्रामाणिकपणे, काम करणे, असा स्वभाव असलेले राजापूर तालुक्यातील सामाजिक, शैक्ष णिक व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
- तालुक्यातील टोलविरोधी आंदोलन, मोकाट गुरांचा प्रश्न, महामार्गावरील रखडलेली विकासकामे अशा विविध प्र श्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेत आवाज उठवला असून अनेक कामे मार्गी लावली आहेत.
- प्रशासनाशी असलेल्या निकट संबंधांमुळे सर्वसामान्य ना गरिकांची शासकीय कार्यालयातील रखडलेली कामे पूर्ण करून देण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो.
- कोंढेतड गावातील अंतर्गत हमरस्ते, पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईटचे प्रश्न त्यांनी यशस्वीपणे सोडवले असून आता धोपे श्वर गणातील धोपेश्वर, गोवळ, शेढे, शीळ, कोदवली, गोठ णे-दोनिवडे व चिखलगाव या गावांतील प्रत्येक वाडी-व स्तीवर स्ट्रीट लाईट बसविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
- तसेच धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकर ण व सुशोभीकरण, राजापूर–शीळ–चिखलगाव मार्गे सौं दळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणाची मागणी त्यांनी आमदार, पालकमंत्री व खासदार यांच्याकडे केली आहे.
- अपघातग्रस्तांना तातडीची मदत, निराधार कुटुंबांना आर्थि क सहाय्य मिळवून देणे, तसेच हिंदू-मुस्लिम सर्व धर्मीयां च्या सुख-दुःखात सहभागी होणे ही त्यांची ओळख आहे.
- अशा सामाजिक कार्याच्या जोरावर श्री. अरविंद लांजेकर यांची उमेदवारी धोपेश्वर गणात चर्चेचा विषय ठरत असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











