
हातदे पाटीलवाडी येथे ३३ वा वार्षिक क्रीडा महोत्सव व पाटीलवाडी प्रीमियर लीगचे आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे हातदे (पाटीलवाडी) येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पाटी लवाडी ग्रामस्थ मंडळ – स्थानिक, पाटीलवाडी ग्रामस्थ मं डळ – मुंबई आणि श्री.रामेश्वर क्रीडा मंडळ – मुंबई (हातदे-पाटीलवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ३३ व्या वार्षिक क्री डा महोत्सवा अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर स्पर्धा शनिवार दि. १० मे २०२५ व रविवार दि. ११ मे २०२५ रोजी तांबटीचा माळ येथील मैदानावर खेळव ण्यात येणार आहेत.
- यावर्षीच्या स्पर्धा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते कै.प्रदिप सखारा म चव्हाण यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘कै.प्रदिप स खाराम चव्हाण स्मृतीचषक’ या नावाने आयोजित केल्या जाणार आहेत.
- या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याला रोख ₹५०,०००/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक : रोख ₹२५,०००/- व आकर्षक चषक त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गो लंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासाठी स्वतंत्र चषक, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक आणि प्रथ म व द्वितीय क्रमांक संघातील सर्व खेळाडूंना मेडल अशी बक्षीसे निश्चित करण्यात आली आहेत.
- या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व को ल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत.
- याशिवाय दि. १० मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता वाडीत पाटीलवाडी प्रीमियर लीग (PPL) ही अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केली आहे.
- वाडीतील एकोपा वाढावा, प्रेम आणि स्नेह अधिक दृढ व्हावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी, मज्जा मस्तीचा आ नंद लुटावा व वाडी एक कुटुंब म्हणून अधिक मजबूत व्हा वी हा उद्देश लक्षात घेऊन कोणत्याही वयोगटातील व्यक्ती (लहान मुलं, तरुण, वयोवृद्ध, महिला व पुरुष) या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत.
- क्रिकेट स्पर्धांबरोबरच मंडळ वर्षभर विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करत असते. समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून मंडळ सामा जिक बांधिलकी जपत आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/