तुकाराम मुंडेंचा दणका: दिव्यांगाचा छळ कराल तर पाच वर्षे तुरुंगात जावे लागेल दंडाधिकारी यांच्यावर दिव्यांगाच्या सुरक्षिततेची आता जबाबदारी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दिव्यांग व्यक्तींचे होणारे छळ हिंसाचार आणि शोषणाच्या घटनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण क रण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडा धिकारी यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले असून दिव्यांगाचा छळ करणाऱ्या दोषींना पाच वर्षे शिक्षा होऊ शकते.
  • त्या संदर्भात शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने गुरुवारी दि १३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या शोषणाला प्रति बंध व कारवाईच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्ध ती विकसित करण्यात आली आहे.
  • या कार्यपद्धती द्वारे तक्रारीचे निवारण तात्काळ कारवाई संरक्षणात्मक उपाय, वैद्यकीय मदत, पुनर्वसन आणि काय देशीर सहाय्यक यासाठी स्पष्ट दिशा आणि निर्देश निश्चित केले आहेत.
  • उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी हे दिव्यांग व्यक्तीवरील छळ दिवसाच्या आणि शोषणाच्या घटनांची दखल घेऊन त्वरित प्रतिबंधात्मक पावले उचलतील पीडि त व्यक्तीचे संरक्षण वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन यासा ठी आवश्यक मदत करतील.
  • दिव्यांग व्यक्ती त्यांचे प्रतिनिधी किंवा स्वयंसेवी संस्था या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून शकणार आहेत.
  • पोलिसांकडून दिव्यांगाच्या छळाबाबतची तक्रार संबंधित उपविभागीय किंवा जिल्हा दंडाधिकारी दाखल होईल तसे च दंडाधिकारी स्वतःहून कारवाई सुरू करणार आहेत.
  • तक्रार प्राप्त झाल्यानंतर पीडीत सुरक्षा वैद्यकीय मदत पुन र्वसन सुविधा देण्याचे निर्देश दंडाधिकारी पोलीस तसेच प्रशासनाला देतील त्याचबरोबर दंडाधिकारी सदर प्रकरण न्यायिक दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग करू शकणार आहेत.
  • पाच वर्षे शिक्षा
  • दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या छळ हिंसाचार आ णि शोषण करणाऱ्या व्यक्तींना किमान सहा महिने आणि किमान पाच वर्ष कारवासाची शिक्षा तसेच दंडाची तरतूद आहे.
  • कोण आहेत मुंडे
  • मिस्टर क्लीन म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधि कारी तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत त्यांच्या २० वर्षात २४ बदल्या झाल्या आहेत.
  • अडगळीतले पद म्हणून त्यांना दिव्यांग कल्याण विभाग देण्यात आले मात्र त्यांनी या दुर्लक्षित विभागात उत्खनन सुरू केल्याने अनेकांची पंचायत होणार आहे. मुंडे यांनी दुर्लक्षित विभागाला चर्चेत आणले आहे.
  • दिव्यांगाच्या राखीव जागावर दिव्यांग असलेले बनावट प्र माणपत्र घेऊन हजारोंनी सरकारी नोकऱ्या पटकावले आ हेत त्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश तुकारा म मुंडे यांनी दिले आहेत.
  • या निर्णयाने सर्व दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचे वातावर ण निर्माण झाले आता दिव्यांग बांधवांना स्वतःची हक्का ची जागा व न्याय मिळणार अशी आशा पल्लवीत झाली आहे.
  • या निर्णयाचे दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामा जिक संघटनेच्या वतीने तसेच सर्व दिव्यांग बांधवांच्या व तीने कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles