
परंड्यात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा भव्य ‘रूट मार्च’कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; नागरिकांना शांततेचे आवाहान.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-आगामी गणपती बा प्पा विसर्जन मिरवणूक शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी परंडा पोलीस प्रशासना च्या वतीने शहरात भव्य रॅली म्हणजेच ‘रूट मार्च’ काढ ण्यात आला.
- परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
- विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना नि र्माण व्हावी, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
- परंडा पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली ही भव्य रॅली श हरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख मार्गांवरून काढ ण्यात आली.
- यावेळी पोलिसांनी शिस्तबद्ध संचलन करत नागरिकांना सुरक्षिततेची ग्वाही दिली.
- आगामी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असू न, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख नियो जन करण्यात आले आहे.
- उत्सव काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- या भव्य रूट मार्चमध्ये परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नि रीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसट,पोली स निरीक्षक मुळे, पोलीस उपनिरीक्षक अडसूळ, तसेच पोलीस कर्मचारी फिरोज शेख, गायकवाड, शिंदे, गुंडाळे, जगदाळे, झाडे, मेहत्रे, कनचे, जाधव, खताळ, राऊत, पवा र, शेवाळे, क्षीरसागर आणि होमगार्डचा सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






