
आंधळ्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल सिईआयआर पोर्टलद्वारे शोधून केला परत.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- वाडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या दक्षतेने आणि सिईआयआर(केंद्रित उपकरण ओळख नोंदणी)या आधुनिक पोर्टलच्या मदतीने एका आं धळ्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल शोधून त्या मालकास परत करण्यात आला आहे.
- एनसी क्रमांक २९९/२५ अंतर्गत दाखल झालेल्या या प्रक रणात पोलीस कर्मचारी गजानन साखरकर यांनी तांत्रिक साधनांचा उपयोग करून मोबाईल शोधून काढला.

- त्यानंतर कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्श नाखाली तसेच पोलिस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे व गजानन साखरकर यांनी शनिवार ११ ऑक्टोबर रोजी हर विलेला मोबाईल मालक आनंद चेरादास दुधे (वय३५ रा.चिचघाट) यांना परत देण्यात आला.
- सदर मोबाईल हरविल्यानंतर दुधे यांनी वडगाव जंगल पो लीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
- पोलिसांनी सि.ई.आय.आर पोर्टलवर आय.एम.ई.आय क्र मांकाच्या आधारे शोध मोहीम राबवली आणि आठवड्या च्या आत मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.
- आंधळ्या व्यक्तीसाठी त्यांचा मोबाईल हा जगाशी संवाद साधण्याचा एकमेव आधार असल्याने वडगाव (जं) पोलि सांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आनंद दुधे यांनी कृतज्ञ ता व्यक्त केली आहे.
- या कामगिरीबद्दल पोलीस कर्मचारी गजानन साखरकर यांचे कर्तव्यशील ठाणेदार विकास दांडे यांच्यासह स्था निक नागरिकांनी कौतुक केले आहे.
- अशा तांत्रिक यशामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे मत परिसरात व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











