
ढाकमोळीचे ग्रामदैवत श्री.समर्थ बाजी मंदिराचा दि.८ व ९ मे रोजी जीर्णोद्धार सोहळा.
- प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे ढाकमोळीचे ग्रामदैवत श्री समर्थ बाजी मंदिराचा जीर्णो द्धार सोहळा गुरुवार दि. ८ व शुक्रवार दि. ९ मे रोजी भव्य आयोजनात संपन्न होत आहे.
- दि. ८ मे रोजी स. ७.३० ते ८.३० धार्मिक विधी (गणपती पुजन व मातृका पुजन), स. ८.३० ते ९.३० अल्पोपहार, स. ९.३० ते १.०९ देवतांची स्थापना,पुजा आणि वास्तु हो म, दु. १ ते २.३० महाप्रसाद, दु. ३ ते ४ मंदिर प्रदक्षिणा,सा यं ७.३० ते ९.०० महाप्रसाद, रात्री १०.०० वा. किम सचि न चाहते परिवार निर्मित चाहत्यांचे बहुरंगी भारुड, गण,गौ ळण, ऐतिहासिक महानाट्य कृती “गर्जती तोफांचे चौघडे”, लेखक/दिग्दर्शक/गीतकार श्री शाहीर सचिन धुमक नृत्य दिग्दर्शक श्री योगेश ओकटे, सुत्रधार श्री गणेश भुवड यां चा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे.
- तसेच शुक्रवार दि. ९ मे रोजी स.८.०० ते दु. १२.३० प्राण प्रतिष्ठा, स. ८.३० ते ९.३० अल्पोपहार, दु. १.०० वा. कल शारोहण, दु. ३ ते ५ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायं ६ ते रात्री ८.३० हरिपाठ व किर्तन किर्तनकार ह.भ.प. रुपेश महाराज राजे शिर्के (कोकण दिंडी मालक) मु.पो. वेहेळे रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत महाप्रसाद आणि रात्री १०.०० वा. पाल खी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- सदर जिर्णोद्धार सोहळ्या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक का र्यक्रमाला सहकुटुंब व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवा हन ढाकमोळी ग्रामस्थांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/