
अकोला बाजार येथे वक्फ विधेयकाला मुस्लिमांकडून विरोध; शुक्रवारी मस्जिदमध्ये हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- वक्फ बिल हे मुस्लिम वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी कायदा आ हे. या कायद्यात दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने एक विधेयक मांडले.
- या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी अकोला बाजार येथील सर्व मुस्लिम बांधवानी शुक्रवारी नमाज नंतर हाता ला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.
- वक्फ सुधारणा विधेयक 2025 हे जुने मुस्लिम वक्फ का यदा 1923 रद्द करण्याचा प्रयत्न आहे. या विधेयकमुळे वक्फ मालमत्तेवर सरकारचा अधिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे.
- वक्फ बोर्डाला मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी जास्त अडचणी येऊ शकतात.
- यामुळे वक्फच्या धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होईल. या चा विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कडुन समाजाला आवाहन करण्यात आले आहे.
- ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही वैयक्तिक काय द्याच्या बाबतीत मुस्लिम हिताचे प्रतिनिधित्व करणारी भारतातील एक संस्था आहे.
- 1973 मध्ये भारतातील मुस्लिमामध्ये इस्लामिक वैयक्ति क कायद्याचे संरक्षण आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली.
- या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार वक्फ बो र्ड बिल रद्द करण्यात यावे, याकरिता अकोला बाजार येथी ल जामा मस्जिद मध्ये शुक्रवारी दुपारी नमाज चे वेळी उप स्थित सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी हाताचे दंडाला काळ्या फिती बांधून विरोध दर्शवीला.
- शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुस्लिम बांधव काळ्या फिती लावुन शांततेत निषेध करताना दिसत होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/