
यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शाळा के.के.स्प्रिंग डेल इंग्लिश मीडियम येथे रायफल शुटींग स्टेडियमचे उद्घाटन सोहळा पार पडला.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :-यवतमाळ तालु क्यातील अकोला बाजार येथील के.के.स्प्रिंग डेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे यवतमाळ जिल्ह्यातील पहिल्या रायफल शुटिंग स्टेडियमचा उद्घाटन सोहळा दिनांक 7 मे रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
- या प्रासंगिक सर्व मान्यवरांनी छत्रपतींच्या प्रतिमेला अभि वादन केले तर माजी सैनिक पवन जगताप यांनी उपस्थि त विद्यार्थ्यांना आणि पालकांना रायफल हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवत नेमबाजीचे महत्व समजावले.
- हातात रायफल घेतली की फक्त ध्येय दिसायला हवं. ल क्ष्यावर अचूक नेम साधण्याकरिता मानसिक एकाग्रता,शि स्त आणि सातत्य लागते,असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश राजूरकर, पव न जगताप, पिएसआय भाऊराव बोकडे होते.
- तर प्रमुख पाहुणे म्हणून हमीद पठाण, सुनील कन्नावार, गिरीश जगताप,सचिन कोयरे, महाविद्यालयाचे संस्थापक कृष्णराव कावळे, संयोजक गौरव कावळे, विजय डाखोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील,सर्व शिक्षक-शिक्षि का, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रायफल शुटिंगसारखा खे ळ उपलब्ध करून देणारी ही शाळा जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद पाऊल असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
- तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, विद्या र्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा
- भविष्यात याच गुणांचा फायदा व्हावा याच उदात्त हेतूने संयोजक गौरव कावळे यांनी पुढाकार घेऊन शाळेत राय फल शुटींग स्टेडियम सुरू केले असून पालकांनी, विद्यार्थां नी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/