एस.टी चा तोटा कमी करण्यासाठी प्रवासी भाडेवाढ, एस. टी. भूखंड भाडेपट्टा कालावधीत वाढ, या पर्यायांचा फेरविचार होणे आवश्यक – दीपक चव्हाण.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-सन १९९० नंतर एस. टी.महामंडळाच्या तोट्याचा आलेख चढता आहे आणि खाजगी वाहतूकदरांच्या फायद्याचा आलेख चढता आहे.
  • जर खाजगी वाहतूकदार आपला व्यवसाय फायद्यात करू शकतात तर एस. टी. महामंडळ तोट्यात का चालले आहे. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
  • एस.टी.महामंडळ फायद्यात चालावे अशी राज्य शासनाची मासिकता असेल तर एस. टी. महामंडळाला पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे.
  • महामंडळावर राज्य शासनाचा अंकुश असावा पण हस्तक्षे प नको. चालक, वाहक आणि कर्मचारी यांच्या बदलीतही राज्य शासनाचा हस्तक्षेप असावा, याला काय म्हणावे?
  • त्यापेक्षा परिवहन विभाग, आणि वाहतूक विभाग यांच्या नियमाची अंमलबजावणी योग्य रीतीने आणि काटकोर प णे झाल्यास राज्य शासनाला एस. टी. महामंडळाला अनु दान देण्याची गरज भासणार नाही.
  • खाजगी वाहतूदारांना कोणतेही अनुदान नसताना ते जर आपला व्यवसाय फायद्यात करू शकतात तर एस.टी. म हामंडळ आपला व्यवसाय फायदा नको, ना नफा,ना तोटा का करू शकत नाही याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
  • भाडेपट्टा कराराचा कालावधी वाढवून फायदा सोडाच तो टा आणखीच वाढेल त्या वेळी एस. टी. च्या जागा विकून एस. टी. महामंडळाचा तोटा भरून काढणार काय…?
  • एस.टी. महामंडळ तोट्यात जाण्यासाठी अनेक करणे आहेत.
  • प्रामुख्याने, १) संचालक मंडळ, २) प्रशासन, ३) वाहतूक (R.T.O.) आणि ४)राज्य शासनाचा हस्तक्षेप. १) एस. टी. महामंडळाच्या संचालकाची नेमणूक कोण करतात.?
  • आमच्या माहिती प्रमाणे ही नेमणूक राज्य शासन करते. हे संचालक कोण असतात? तर ते राजकारणी नेत्यांचे हित – संबंधी व्यक्ती असतात?
  • त्यांचा सार्वजनिक प्रवाशी वाहतूकीचा अभ्यास कीती असतो…? याचा कोणी विचार करतो का? १९६० पासून सुरुवातीच्या २५/ ३० वर्षाच्या कालावधीत सन्मानाने आ णि फायद्यात चालणारी एस.टी. तोट्यात का जाऊ लाग ली याचा कधी अभ्यास, विचार तरी केला का? की फक्त एस.टी.महामंडळाच्या कामाकरिता निघणाऱ्या निविदाचा च विचार केला? एस. टी. फायद्यात चालावी म्हणून संचा लक मंडळ काय प्रयत्न करते? याचा राज्य शासनाने त्यां ना कधी जाब विचारला का? एस. टी. महामंडळ प्रामुख्या ने प्रवाशी आणि एस. टी. कर्मचारी यांच्यामुळेच चालते हे कोणीच नाकारू शकत नाही.
  • म्हणून आम्ही सातत्याने सूचना करीत असतो की, संचाल क मंडळात किमान एक संचालक प्रवाशांचा प्रतिनिधी अ‌ सावा आणि एक संचालक एस. टी. कर्मचाऱ्यांचा प्रतिनि धी असावा जेणेकरून त्यांचा अनुभवाचा आणि अभ्यासा चा उपयोग होईल.
  • २) प्रशासन : आमच्या माहिती नुसार एस.टी.चे प्रशासकी य कामकाज एस. टी. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा व्य वस्थापकीय संचालक, आणि सर्व महाव्यास्थापक पाहता त संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने धोरणात्म क निर्णय घेतात.
  • काही वर्षांपूर्वी एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार असायचे ( असे शेवटचे अध्यक्ष मा. सुधाकर परिचारिक असावेत.
  • पण भाजपा – शिवसेना युतीच्या काळात एखादे वेळी एस .टी.चे हित पाहून एस. टी. चे अध्यक्ष म्हणून मा.परिवहन मंत्री, महाराष्ट्र सरकार यांचीच नियुक्ती केली जाऊ लागली.
  • ती आजतागायत हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याचा विचार कारण्यांची आवश्यकता आहे.
  • हा निर्णय घेतल्यापासून एस.टी.ची प्रगती झाली की अधो गती? त्यावेळे – पासूनच एस.टी. तोटा वाढायला लागला, एस.टी.चा तोटा कमी करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तान्तरीत करा. एस. टी. चे भूखंड भाडे तत्वावर देणे,
  • गाड्या भाडे तत्वावर घेणे या सारखे अनेक निर्णय घेऊन एस.टी.महामंडळ अधिकच अडचणीत आणि तोट्यात आले.
  • एस टी.चा तोटा कमी करण्यासाठी प्रवासी भाडे वाढ, भा डेपट्टाचा कालावधी वाढविणे असे पर्याय नसून आर्थिक झिरपणे होत नाही ना? याचा अभ्यास करून त्यावर वेळी च उपाय योजना करणे गरजेचे आहे.
  • मा.परिवहन मंत्रीच एस. टी. अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा आदर ठेऊन मा.उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय, मा. महा व्यवस्थापक आणि तत्सम अधिकारी आपले विचार, मत, सूचना किंवा निर्णय ठामपणे मांडू शकत नाहीत किंवा मांडत नाही.
  • पूर्वी अध्यक्ष (सत्ताधारी पक्षाचे आमदार), मा.उपाध्यक्ष त था व्यवस्थापकीय संचालक, मा. महाव्यवस्थापक आणि तत्सम अधिकारी एकत्रित धोरणत्मक किंवा निर्णय घेत आवश्यक त्या ठिकाणी मा.परिवहन मंत्री यांची मदत,मार्ग दर्शन घेत.
  • त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सखोल अभ्यास व चर्चा व्हायची. आता वर वर विचार करून निर्णय घेतले जातात.
  • आताचेच उदाहरण द्यायचे झाल्यास वैयक्तिक तिकीट घेत ल्यास प्रवास भाडयात १५% सवलत आणि ग्रुप धारक प्रवाशाला ३०% जादा प्रवासी भाडे, म्हणजे किरकोळ वि क्रीवर सवलत, घाऊक विक्रीवर अधिभार हे कोठले व्यव सायिक धोरण? ही सूचना सुचवणारे सुपीक डोके कोणा‌ चे? ३०% प्रवास भाडेवाढीचा निर्णयाला प्रवाशांचा निषेध, नाराजी या मुळे एका दिवसात टी निर्णय मागे घ्यावा लागला.
  • एस.टी. वर ही नामुष्की कोणामुळे आली? अशा निर्णया मुळे कर्मचाऱ्यांचे काम कारण नसताना वाढते एस.टी. प्रमुख घटक प्रवासी एस.टी. पासून दुरावतो.
  • ३) वाहतूक (R.T.O.) विभाग. एस. टी. प्रवासी वाहतूक आणि खाजगी प्रवासी वाहतूक यांच्या नियमांचे वाहतूक विभागकडून पाहिजे तशी अंमलबजावणी केली जात नाही.
  • एस.टी. ची प्रवासी वाहतूक ही टप्प्याची वाहतूक आहे,त्या साठी प्रवासी कर प्रणाली वेगळी असून जास्त प्रमाणात कर द्यावा लागतो. खाजगी वाहतूकदारांनी थेट प्रवासी वा हतूक केली पाहिजे. पण तेही टप्प्याची वाहतूक करतात.
  • एस.टी.आगार, एस.टी. बस स्थानक, एस.टी. थांबा, यापा सून २०० मीटर पेक्षा लांब खाजगी गाड्या उभ्या करण्या ची परवानगी असते, त्याच प्रमाणे खाजगी गाड्यांची बुकिंग कार्यालय सुद्धा २०० मीटर लांब असली पाहिजेत हे सर्व नियम सरसकट धाब्यावर बसविले जातात.
  • मुंबईत हे चित्र मुंबई, मुंबई उपनगर ते पनवेल, नालासोपा रा, विरार, मुंबई बाहेर संपूर्ण महाराष्ट्र सर्वच शहरात असेच चालते एस.टी. मध्यवर्ती कार्यालय आणि मुंबईतील मध्य वर्ती मुंबई सेंट्रल आगार यांचा मुख्य दरवाजा शेजारी खा जगी प्रवासी वाहतूकदारांची बुकिंग कार्यालय आहेत.
  • याकडे वाहतूक (R.T.O.) विभाग का दुर्लक्ष करतो? हे न उलगडणारे कोडे आहे. एस.टी.अधिकारी याबाबत आपले अध्यक्ष तथा परिवहन मंत्री यांच्याकडे तक्रार का करीत नाही? त्यांच्या निदर्शनास का आणून देत नाही.? याचाही विचार करावा लागेल.
  • ४) राज्य शासनाचे मान.परिवहन मंत्रीच एस.टी. महामंड ळाचे अध्यक्ष असल्यामुळे राज्य शासनाचा प्रत्यक्ष हस्तक्षे प असतो.
  • अध्यक्ष यांच्या निर्णयावर संचालक, उपाध्यक्ष तथा व्यव‌ स्थापकीय संचालक, एस. टी. वरिष्ठ अधिकारी आपले स्पष्ट मत मांडत नाहीत असे वाटते.
  • एस.टी. कर्मचारी बदली पासून ते धोरणत्मक निर्णय पर्यंत राज्य शासनाच्या परवानगीने किंवा सूचनेने घ्यावे लागतात.
  • राज्य शासन परवानगीने/ सुचनेने कित्येक चालक वाहक यांच्या बदल्या केल्या जातात, त्यामुळे काही आगारात गा ड्या उपलब्ध असतात पण चालक वाहक यांची कमतरता असते.
  • तर काही आगारात चालक वाहक उपलब्ध असतात तर गाडयांची कमतरता असते काही ठिकाणी तर प्रवाशांची उपलब्धता नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आग्र‌ हाखातर गाड्या चालवाव्या लागतात.
  • एस.टी. गाडीला जास्त भारमन कसे आणि कोठे मिळेल हे एस. टी.चे चालक वाहक, आगर व्यवस्थापक आणि प्रवाशीच सांगू शकतात.
  • त्यांच्या सुचनांचा आदर आणि विचार केला तर एस.टी.चा तोटा नक्कीच कमी होईल, किंबहुना एस. टी. फायद्यात येईल असे प्रवाशी मित्र आणि गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, कार्याध्यक्ष दीपक मा. चव्हाण यांनी म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles